जैन ओसवाल उत्सवात रंगला कबड्डीचा सामना; अहमदनगर; श्री जैन ओसवाल पंचायत सभा संचलित जैन ओसवाल युवक संघ (जॉय) आयोजित स्नेहउत्सवचे उत्...
अहमदनगर;
श्री जैन ओसवाल पंचायत सभा संचलित जैन ओसवाल युवक संघ (जॉय) आयोजित स्नेहउत्सवचे उत्साहात सुरूवात झआली. खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते बुद्धिबळ, कबड्डी स्पर्धांचा प्रारंभ झाला.
गांधी म्हणाले, समाजाला अल्पसंख्यांक दर्जा मिळाला असला तरी त्याच्या विविध योजना सर्वांपर्यंत न पोहोचल्याने त्यांचा फायदा घेतला जात नाही. यासाठी स्वत: पुढाकार घेऊन शहर व ग्रामीण भागासाठी नवीन नियोजनबद्ध नवा प्रकल्प राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रीमियर कबड्डी लीगप्रमाणो आयोजित कबड्डी स्पर्धात सर्व वयोगटातील खेळाडू सहभागी झाले होते. सीए अशोक पितळे यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, जैन समाज अध्यक्ष सीए रमेश फिरोदिया, नरेंद्र फिरोदिया, शेलेश मुनोत, अशोक पितळे, चेतन बोगावत, बाबुशेठ बोरा, राजेंद्र चोपडा, संजय चोपडा, सीए अशोक पितळे, सुनील मुनोत, रवींद्र कटारिया, प्रसन्न मुथा, रसिक कटारिया, विलास गांधी, डॉ.सचिन भंडारी, कमलेश पितळे, पोपट भंडारी, किशोर गांधी, कमलेश भंडारी, संजय बोरा, ललित गुंदेचा, आदेश चंगेडीया, माजी अध्यक्ष समीर बोरा, अध्यक्ष सचिन डुंगरवाल, सचिव राजू बोरा उपस्थित होते.










