Archive Pages Design$type=blogging

डोंगरगणला आज श्री रामेश्‍वराचा यात्रोत्सव

डोंगरगणला आज श्री रामेश्‍वराचा यात्रोत्सव ; जेऊर  ; नगर तालुक्यातील डोंगरगण येथे आज सोमवार, दि. २२ रोजी भव्य यात्रोत्सव संपन्न ...


डोंगरगणला आज श्री रामेश्‍वराचा यात्रोत्सव ;
जेऊर  ;
नगर तालुक्यातील डोंगरगण येथे आज सोमवार, दि. २२ रोजी भव्य यात्रोत्सव संपन्न होणार आहे. डोंगरगण येथील पवित्र तीर्थक्षेत्र रामेश्‍वर मंदिरात हा यात्रोत्सव संपन्न होणार आहे. येथील आख्यायिका अशी-. गर्भगिरीच्या पर्वतरांगांमध्ये निर्सगाच्या कुशीत डोंगरगण गाव वसलेले आहे. 
प्रभू रामचंद्र वनात असताना डोंगरगण येथे तीन दिवस मुक्कामास होते. शृंग ऋषींना झालेला चर्मरोग बरा करण्यासाठी रामाने येथे दिव्य बाण मारल्याची आख्यायिका आहे. डोंगरगण येथे प्रभू रामचंद्रांनी पंचमुखी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली आहे. तसेच सीतेसाठी स्नानगृह बनविलेले आहे. त्यावरूनच या गावाला सीतेचे डोंगरगण असे नाव पडले आहे. राम विजय ग्रंथाच्या १४ व्या अध्यायात डोंगरगण गाव व येथील तीर्थक्षेत्राचा उल्लेख आढळतो. दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसर्‍या सोमवारी येथे यात्रोत्सव भरतो. यात्रोत्सवानिमित्ताने
आ. शिवाजीराव कर्डिले, उदयसिंह पाटील (चेअरमन,तनपुरे साखर कारखाना) यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात येणार आहे. उदयसिंह पाटील यांच्या वतीने दरवर्षी भक्त भाविकांसाठी खिचडी व दुधाचे वाटप करण्यात येते. यात्रोत्सव काळात येणार्‍या भक्त भाविकांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असल्याची माहिती सरपंच कैलास पटारे यांनी दिली.
संपूर्ण राज्यातून येथे मोठ्या संख्येने भक्त भाविक दर्शनासाठी येतात. यात्रोत्सवासाठी देवस्थान, गावातील तरुण, व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून, त्यासाठी सढळ हाताने मदत करावी. जास्तीत भाविकांनी यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन सरपंच कैलास पटारे यांनी केले आहे.

     

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: डोंगरगणला आज श्री रामेश्‍वराचा यात्रोत्सव
डोंगरगणला आज श्री रामेश्‍वराचा यात्रोत्सव
http://epunyanagari.com/epaperimages/22082016/22082016-md-ah-8-1477-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_593.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_593.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago