पिंप्रीकोलंदर येथील रिलायन्स सेवा विस्कळीत; देवदैठण पिंप्रीकोलंदर येथे असलेले रिलायन्स कंपनीचे मोबाईल टॉवर बंद पडत असल्याने गेल्या ...
देवदैठण
पिंप्रीकोलंदर येथे असलेले रिलायन्स कंपनीचे मोबाईल टॉवर बंद पडत असल्याने गेल्या काही दिवसांपासून कंपनीची सेवा खंडित होत आहे. यामुळेग रिलायन्सच्या मोबाईल ग्राहकांमध्ये नाराजी आहे. कंपनीने आपल्या सेवेत तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी
मोबाईल ग्राहकांमधून होत आहे. पिंप्रीकोलंदर येथील रिलायन्स कंपनीचे टॉवर हे मास्टर टॉवर असून, ते बंद पडल्याने देवदैठण, राजापूर, म्हसे पिंप्रीकोलंदर, उक्कडगाव, कोंडेगव्हाण, येवती, ढवळगाव आदी गावांमध्ये वारंवार रेंज गायब होते. या कंपनीकडून अतिशय अनियमित सेवा मिळते. यामुळे असून अडचण, नसून खोळंबा,अशी या टॉवरची अवस्था झाली आहे.
अनियमित सेवेमुळे बहुतांश रिलायन्स मोबाईलधारक वैतागले असून, अनेकांनी आपले कार्ड कंपनीकडे इतर मोबाईल कंपन्यांमध्ये बदलून घेतले आहे. रेंज नसल्याने रिलायन्स सीमधारकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो. रिलायन्स कंपनीने आपल्या सेवेत ताबडतोब सुधारणा करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे










