आमदार राजळे यांच्याकडून वारे कुटुंबीयांचे सांत्वन खरवंडी कासार; ताई आम्हाला न्याय दया, आम्ही गरीब ऊस तोडणी मजूर आहोत. माझ्या मु...
|
आमदार राजळे यांच्याकडून वारे कुटुंबीयांचे सांत्वन
|
खरवंडी कासार;ताई आम्हाला न्याय दया, आम्ही गरीब ऊस तोडणी मजूर आहोत. माझ्या मुलीचा घात झाला आहे. माझी मुलगी १५ ऑगस्ट दिवसी ध्वजारोहण करून आली आणि परत आम्हाला भेटलीच नाही, अशी विनवणी ढाकणवाडी येथील मयत पूजा वारे हिचे वडील बाळासाहेब वारे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्याकडे केली.
|
आमदार राजळे यांनी वारे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व तपास लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी समाजकल्याण सभापती पांडुरंग खेडकर,माजी पंचायत समिती सदस्या काशीताई गोल्हार,भालगाव ग्रामपंचायत सदस्य अशोक खरमाटे, ढाकणवाडीचे सरपंच आर.आर. ढाकणो, खरवंडीचे सरपंच बुधाजी ढाकणो, मालेवडीचे सरपंच पांडुरंग खेडकर, भारजवाडीचे सरपंच माणिक बटुळे, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन सुनील अंदुरे, वामन कीर्तने, अरुण ढाकणो, माजी सरपंच बाबूराव ढाकणो, मिडसांगवीचे सरपंच दत्तूनाना पठाडे, बाळासाहेब गोल्हार, नीळकंठ आव्हाड आदी उपस्थित होते. पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी येथील पूजा बाळासाहेब वारे ही विद्यार्थिनी १५ ऑगस्ट दिवसी बेपत्ता होती. १६ ऑगस्ट रोजी विहिरीमध्ये मृतदेह निदर्शनास आला. आमदार राजळे म्हणाल्या की, घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचा तपास लवकरात लवकर लावण्यात येईल व दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल.










