जिल्हास्तर धनुर्धारी क्रीडा स्पर्धा ; नेवासा फाटा येथे आयोजित जिल्हास्तरीय धनुर्धारी स्पर्धेतील सहभागी खेळाडू. नेवासाफाटा : जिल्हा...
जिल्हास्तर धनुर्धारी क्रीडा स्पर्धा ;

नेवासा फाटा येथे आयोजित जिल्हास्तरीय धनुर्धारी स्पर्धेतील सहभागी खेळाडू. नेवासाफाटा : जिल्हा क्रीडा कार्यालय अहमदनगर अंतर्गत नगर जिल्हा धनुर्धारी संघटना दळवी स्पोर्ट अँकेडमी व माऊली दर्शन संकुलातर्फे नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेसाठी मोठा प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे उद््घाटन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास गोल्हार यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर क्रीडाधिकारी नंदकुमार रासने, सुधीर बोरकर, अर्जुन कापसे, पप्पू हांडे, ज्ञानेश्वर वाघमारे होते.
१४, १७ व १९ वर्षे वयोगटात इंडियन व रिकर्व्ह राऊंड प्रकारात स्पर्धा घेण्यात आल्या.स्पर्धेत ज्ञानोदय इंग्लिश स्कूल नेवासा, ज्ञानेश्वर कनिष्ठ महाविद्यालय नेवासा, घाडगे पाटील विद्यालय त्रिमूर्तीनगर, ओम गुरुदेव माध्यमिक इंग्लिश स्कूल व आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कोपरगाव, महर्षी विद्या मंदिर कोपरगाव, दादा पाटील राजळे महाविद्यालय अदिनाथनगर (पाथर्डी) या शाळांच्या खेळाडूंनी स्पर्धेत विशेष यश मिळविले.
स्पर्धेतील विजयी खेळाडू- १४ वर्षे वयोगट मुले - ओंकार संजय चौधरी, अर्थव गणेश पैंजणे, सर्मथ गवळी, प्रथमेश ज्ञानेश्वर वाघमारे, मुली- शुभांगी मनोहर शेजूळ. १७ वर्षे वयोगट - अजिंक्य अनिल भगत, सोमेश उमेश शेवाळे, गौरव शांताराम मगर, रंजित बाळासाहेब वसेकर, सुमित कार्ले.
मुली - जागृती सुधीर कुंदे, कमोज कल्याणदास बैरागी, पल्लवी अशोक इंगळे, क्षितीजा सलीम गुरव, समृध्दी चंद्रकांत वामन, लक्ष्मी नरेंद्र दारवंटे, आरती संजय चवधर. १९ वर्ष वयोगट - सागर मोहन चव्हाण, संकेत सुरेश वाघ, गणेश मारोती मिसाळ, आशुतोष आदिनाथ बडे, निखिल सज्रेराव वसेकर.
मुली- साक्षी राजेंद्र शितोळे, अश्विनी काकासाहेब सहाने, अमृता अरबिंदो बिस्वास.
या खेळाडूंना अहमदनगर धर्नुधारी संघटनेचे सचिव व मुख्य प्रशिक्षक अभिजित दळवी, डॉ.शुभांगी रोकडे यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशाल वाकचौरे, सागर मोहिते, पांडूरंग उदे, शुभम जाधव, किशोर बेरड यांनी परिश्रम घेत









