स्वातंत्र्यदिनानिमित्त वादविवाद व वकृत्व स्पर्धा; अहमदनगर ; स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी...
अहमदनगर ;
स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ विद्या समितीच्या सहकार्याने नगरमध्ये जिल्हास्तरीया कथाकथन, वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आनंदऋषिजी हॉस्पिटल शेजारी बडीसाजन मंगल कार्यालय येथे शनिवारी ९ता. २0) सकाळी १0 वाजता या स्पर्धेचे उद.घाटन होईल.
स्पर्धा प्रमुख प्राचार्य सुनील पंडित यांनी स्पर्धेची माहिती दिली. कथाकथन स्पर्धा पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांकरीता घेण्यात येणार आहे. कथाकथनचा विषय राष्ट्रीय हित, देशभक्ती किंवा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जीवनावरील कथेवर असणार आहे. वक्तृत्व स्पर्धा आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता घेण्यात येणार आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवनदर्शन, भारताची महासत्तेकडे वाटचाल-सत्य आणि भ्रम, पाटी पेन्शिल ते संगणक असा शिक्षण प्रवास, सामाजिक मुल्यांचे समाज जीवनातील स्थान आणि आजच्या समाजातील समाजिक समरसतेचे महत्व हे विषय असतील. वादविवाद स्पर्धा अकरावी ते बारावीमधील विद्यार्थ्यांकरीता घेण्यात येणार आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पाश्चात्यांचे अनुकरण घातक आहे हा वादविवाद स्पर्धेकरीता विषय आहे. या तीनही स्पर्धेतील विजेत्यांना पाच, तीन व दोन हजार रुपये पारितोषिकांनी गौरविम्यात येणार आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक एक हजार रुपये असणार आहे










