जड वाहतुकीपासून सावधान.. अहमदनगर : जड वाहतूक टाळावी, त्याचे नियम पाळावे असे आवाहन दरवेळी केले जाते. याला प्रतिसाद मिळत नसेल, तर उ...
जड वाहतुकीपासून सावधान..
![]()
अहमदनगर : जड वाहतूक टाळावी, त्याचे नियम पाळावे असे आवाहन दरवेळी केले जाते. याला प्रतिसाद मिळत नसेल, तर उपप्रादेशिक परिवहन आणि शहर वाहतूक पोलिसांना कारवाईचे अधिकार आहेत. पण, शहरातून होणार्या जड वाहतुकीकडे या दोन्ही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वारंवार दिसत आहे. नगर-मनमाड रस्त्यावरून सोमवारी सायंकाळी स्टीलची घेऊन जाणार्या टेम्पोंवरचा माल अतिरीक्त भारामळे रस्त्यावर पडला. सुदैवाने यावेळी टेम्पोंच्या पुढे आणि मागे वाहने नव्हती. शहरातून होणार्या अशा जड वाहतुकींवर कारवाई होत नसल्याने सध्या, तरी सावधानता हाच उपाय आहे.
|










