गणवेशासाठीविद्यार्थिनीनी केली आत्महत्या नांदेड : गणवेश न घातल्याने शिक्षिकेने वर्गाबाहेर काढले म्हणून एका विद्यार्थीनीने आत्म...
नांदेड : गणवेश न घातल्याने शिक्षिकेने वर्गाबाहेर काढले म्हणून एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड मध्ये घडली आहे. नांदेड शहरातील यशवंत नगरमधील विवेकवर्धीनी विद्यालयातील ही घटना आहे.
इयत्ता 8 वी मध्ये शिकणारी संध्या सोनकांबळेला वर्गशिक्षिकेने गणवेश न घातल्याने वर्गाबाहेर काढले होते असा आरोप होत आहे. गणवेश न घातल्याच्या कारणाने विद्यार्थीनाला बाहेर काढण्यात आले. अपमान सहन न झाल्याने 13 वर्षीय संध्याने शनिवारी दुपारी शाळेतून परतल्यानंतर राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे.










