१७ कर्मचार्यांचा टाईमपास; ■ लघु पाटबंधारे विभागात एक शाखा अभियंता दिवसाआड कामावर येत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. कर्मचार्...
■ लघु पाटबंधारे विभागात एक शाखा अभियंता दिवसाआड कामावर येत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. कर्मचार्यांसाठी थम इम्प्रेशन यंत्रणा आहे. मात्र, तांत्रिक कर्मचार्यांना ती लागू नसल्याने या शाखा अभियंत्याचे फावत असल्याचे सांगण्यात आले. अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन वेळेत टाईमपास करणारे १७ क र्मचारी शुक्रवारी आढळून आले आहेत. प्रशासन आणि पदाधिकारी यांनी केलेल्या संयुक्त तपासणीत हे कर्मचारी सकाळी ११ वाजता चहा टपरीवर असल्याचे दिसून आले. या कर्मचार्यांचा अहवाल तयार करून पुढील कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ आणि जिल्हा परिषदेच्या अन्य कर्मचार्यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता अचानक कामावर आलेल्या कर्मचार्यांची तपासणी मोहीम हाती घेतली. यात सर्वाधिक गैरहजर कर्मचारी कृषी विभागात आढळून आले. गैरहजर असणार्या कर्मचार्यांबाबत विचारणा केली असता, कामावर आल्याबरोबर हे कर्मचारी जिल्हा परिषदेची इमारत सोडून चहा पिण्यासाठी गेले असल्याचे समोर आले.
सामान्य प्रशासन विभागाने या कर्मचार्यांचा अहवाल तयार करून पुढील कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांच्याकडे पाठवला आहे. या कर्मचार्यांवर एका दिवसाची विना वेतनाची कारवाई होवू शकते, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. या कारवाईनंतर जिल्हा परिषदेत अनेक विभागात कर्मचारी खाते प्रमुख यांना जुमानत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अधिकार्यांना धाक दाखवणार्या कर्मचार्यांवर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.










