आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे आनंद अनुभूती शिबीर; अहमदनगर ;आर्ट ऑफ लिव्हिंच्या वतीने दि. ८ऑगस्ट रोजी श्रीराम चौक येथे सकाळी व संध्याकाळ...
आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे
अहमदनगर ;आर्ट ऑफ लिव्हिंच्या वतीने दि. ८ऑगस्ट रोजी श्रीराम चौक येथे सकाळी व संध्याकाळी आनंद अनुभूती शिबिराचे आयोजन केले आहे.
शारीरिक मानसिक तणावामुळे आपले जीवन विस्कळीत होते. नकारात्मक भावना शरीरात विषाप्रमाणे साठून राहतात. त्यामुळे शारीरिक व्याधी उद्भवतात. आपले जीवन जास्तीत जास्त कार्यक्षम,यशस्वी, चैतन्यमय, आनंदी, निरोगी बनविणे या शिबिराव्दारे सहज शक्य आहे. या शिबिरामध्ये कार्यक्षमता वाढविणे, ताण-तणावातून मुक्ती मिळविणे, शारीरिक व मानसिक व्याधी दूर करणे, राग, चिंता नैराश्य या सारख्या नकारात्मक भावना नष्ट करणे, तीक्ष्ण स्मरणशक्ती व विशाल दृष्टिकोन, मनाची एकाग्रता जागरुकता वाढून आपण उत्साही व आनंदी बनतो, मानसिक संतुलन साधल्याने शारीरिक आरोग्य सुधारते. प्रशिक्षक ज्ञानेश्वर भिसे हे या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच योगा प्राणायाम, ध्यान व १७२ आजारांवर एकमेव औषधी असलेली डब्यूएचओ प्रमाणित श्वाशांची सुदर्शन क्रियेचे प्रशिक्षण या शिबिरामध्ये देणार आहे
|










