डॉ. पोखर्णा व श्रीमती नगरे यांना निलंबीत करा; खिश्चन सेवा संघाची मागणी दि. १६ रोजी सिव्हील हॉस्पिटल येथील परिचारीका शैला मार्तंड साळव...
डॉ. पोखर्णा व श्रीमती नगरे यांना निलंबीत करा; खिश्चन सेवा संघाची मागणी
दि. १६ रोजी सिव्हील हॉस्पिटल येथील परिचारीका शैला मार्तंड साळवे यांचा झालेल्या मृत्यू हा आजारीपणामुळे नसून तेथील व्यवस्थापनाच्या गैरकारभाराचा बळी आहे असे खिश्चन सेवा संघाचे स्पष्ट मत झालेले आहे. साळवे यांनी आजारपणाची रजा मागीतलेली असताना त्यांची रजा मंजूर न करणे, आजारातून पूर्ण बरे होण्यापूर्वीच बळजबरीने कामावर हजर होण्यास भाग पाडणे, नर्सिंग स्कूलमध्ये अधिपरिचारीकेचे अधिकृत पद नसताना तेथे त्यांना ड्युटी करण्यास भाग पाडने, बाराबारा तास कामावर राहण्याबद्दल दबाव टाकणे या सर्व बाबी गैरव्यवस्थापनाच्या सदरात मोडणार्या आहेत. तेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पोखर्णा यांचेवर मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खिश्चन सेवा संघाने केली आहे.
संघाचे अध्यक्ष राजू पिलीप शिरसाठ, उपाध्यक्ष आर. एम. आल्हाट, जिल्हाध्यक्ष दिपक खंडागळे यांनी पालकमंत्री ना. राम शिंदे यांची भेट घेवून झालेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली व त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात डॉ. पोखर्णा व श्रीमती नगरे यांना निलंबीत करून कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली.
सिव्हील हॉस्पिटल मधील इतर कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असता अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत. कर्मचार्यांनी वेळोवेळी सिव्हील सर्जनकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. अशा अधिकार्यांना त्वरीत निलंबीत करून त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी खिश्चन सेवा संघाने केली आहे. या प्रसंगी संपर्कप्रमुख अमृतराव शिंदे, जिल्हाध्यक्ष जेम्स आल्हाट, युवा सेना प्रमुख मनोज प्रभुते, संघटक लाजारस पवार, खजिनदार जॉन गायकवाड, मनोहर सोनवणे, अँड़ आरसुड, छगणराव क्षेत्रे, प्रकाश क्षेत्रे, वाघमारे, मयुर बनसोडे व संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते










