विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे आमदार संग्राम जगताप यांचे आश्वासन आदिवासी समाजातील गुणवंतांचा सत्कार; अहमदनगर; समाजाचे...
विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे आमदार संग्राम जगताप यांचे आश्वासन
आदिवासी समाजातील गुणवंतांचा सत्कार;
अहमदनगर;
![]()
समाजाचे प्रश्न सोडविणे तसेच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटनशक्ती महत्वाची असते. नगर शहरात नोकरी, व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या आदिवासी समाजबांधवांनीही संघटीत होवून आपले प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा. त्यासाठी आमचे सहकार्य राहिल, असे आमदार संग्राम जगताप यांनी केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त नगरमधील आदिवासी सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव झाला. महापौर सुरेखा कदम, नगरसेविका प्रतिभा भांगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पु.ना. गांडाळ, प्रा. नितीन तळपाडे आदी उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व शालेय साहित्य भेट देऊन गौरविण्यात आले.
प्रा. तळपाडे म्हणाले, आदिवासी समाज शिक्षणामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. त्याचवेळी या समाजाचा एक मोठा घटक आजही खेड्यापाड्यात, डोंगरदर्यांमध्ये वास्तव्यास आहे. या समाजाच्या अनेक समस्या कायम आहेत. त्या सोडविण्यासाठी शहरात असलेल्या आदिवासी समाजाने एकत्र येऊन प्रय▪करण्याची गरज आहे.
आदिवासी सेवा संघाचे सचिव जगन्नाथ सावळे यांनी संघाच्या कार्याविषयी माहिती दिली. अध्यक्ष विलास भारमल यांनी प्रास्ताविक केले. सुरूवातीला मिरवणूक काढण्यात आली. यात वसतीगृहातील विद्यार्थी तसेच समाजबांधव सहभागी झाले होते. कार्याध्यक्ष शरद कोरडे, महेश शेळके, संतोष नवले, काशिनाथ गवारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. वनिता बोर्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष हनुमंता सोनवणे यांनी आभार मानले
|










