महादजी शिंदे पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न ; अहमदनगर - ; महादजी शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेच्या १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमे...
अहमदनगर - ;
महादजी शिंदे नागरी सहकारी पतसंस्थेच्या १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात व उत्साहात संपन्न झाली. या सभेत सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
याप्रसंगी पतसंस्थेचे माजी व्हा. चेअरमन व संचालक नामदेव काळे यांची सैनिक बँक, पारनेर या बँकेवर संचालकपदी निवड झाल्याबद्दल चेअरमन श्रीकृष्ण येणारे व व्हा. चेअरमन अविनाश म्हस्के, तसेच महाराणी ताराबाई कन्या शाळेचे संस्थापक बबनराव कोतकर व सचिव डी. बी. साळवे यांनी सत्कार केला.
यावेळी संस्थेचे संचालक एम. जी. मासाळ, डी. एस. जोंधळे, पी. आर. श्रीमंदिलकर, व्ही. जी. पोटे, जी. यू. येणारे, संचालिका सौ. एस. आर. गायकवाड, सौ. जी. व्ही. येणारे, अँड़ लता वाघ व संस्थेचे व्यवस्थापक आर. व्ही. पावसे, सौ. सु. ना. शेटे यांच्यासह मोठ्या संख्येने पतसंस्थेचे सभासद उपस्थित होते.










