बहिरवाडी ग्रामपंचायत वनग्राम पुरस्काराने सन्मानित; - नगर तालुक्यातील बहिरवाडी ग्रामपंचायतीस सन 2015- 2016 चा संत तुकाराम वनग्रामच...
बहिरवाडी ग्रामपंचायत वनग्राम पुरस्काराने सन्मानित;
![]()
- नगर तालुक्यातील बहिरवाडी ग्रामपंचायतीस सन 2015- 2016 चा संत तुकाराम वनग्रामचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. शुक्रवार,दि. २९ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरला झालेल्या एका कार्यकमात हा पुरस्कार सरपंच विलास काळे, माजी सरपंच सौ. अंजना येवले,सोसायटी चेअरमन काळूराम काळे, वनक्षेत्रपाल रमेश देवखिळे, वन परिमंडळ अधिकारी साहेबराव ढेरे यांनी स्वीकारला. या वेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, ना. सुधीर मुनगंटीवार, हिवरेबाजारचे पोपटराव पवार, बाळासाहेब हराळ आदी मान्यवर उपस्थित होते. संत तुकाराम वनग्राम पुरस्कार हा राज्यातील तीन गावांना विभागूनदेण्यात आला. बहिरवाडी गावच्या सरपंचपदी विलास काळे, उपसरपंचपदी श्रीकांत दारकुंडे यांची निवड झाल्यानंतर गावामध्ये विविध विकास कामांना चालना मिळाली. सुशिक्षित तरुण नेतृत्व लाभल्याने गावाचा कायापालट झाला आहे. तसेच बहिरवाडी गावामध्ये १९८५ सालापासून वृक्षारोपण करण्यात येत असून, पूर्वी लावलेल्या झाडांची उंची २0 ते २५ फुटांपर्यत गेली आहे. चालूवर्षी १ लाखाच्यावर नवीन झाडांची लागवड करण्यात आली आहे. गर्भगिरीच्या पर्वतरांगांमधील सुमारे २२५ हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात जंगलाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे जंगलामध्ये वन्यप्राण्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी ठिकठिकाणी पाणवठे बनविण्यात आले आहेत.
|










