सिनेअभिनेत्री मधुरा वेलणकर मत ; आढळगाव ; पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांचा सामाजिक,सार्वजनिक कार्यक्रमांतील सहभाग वाढला पाहिजे, अ...
सिनेअभिनेत्री मधुरा वेलणकर मत ;
आढळगाव ;
पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांचा सामाजिक,सार्वजनिक कार्यक्रमांतील सहभाग वाढला पाहिजे, असे मत सिनेअभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी व्यक्त केले.
दौंड येथील ज़ितूशेठ मगर यांच्या हॉटेल योगराज लॉज़िंग-टेरेस गार्डनच्या उद््घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. दौंडमध्ये एवढ्या चांगल्या दर्जाची लॉज़िंग सुविधा सुरू झाल्यामुळे त्यांनी कौतुक केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सह साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे होते.श्री. नागवडे म्हणाले की, दौंड शहरात हॉटेल योगराज लॉजिंग-टेरेस गार्डेनच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंबासह राहण्याची जेवणाची,घरगुती कार्यक्रम साजरे करण्यासाठी चांगली,दज्रेदार सोय झाली आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणो म्हणून दौंडचे मा. नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया,मा. नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे,दौंड, ता.राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अप्पासाहेब पवार,भाजपचे सरचिटणीस वासुदेवनाना काळे, शि. ना.ना.सह कारखान्याचे उपाध्यक्ष तसेच योगराज उद्योग समूहाचे प्रमुख केशवभाऊ मगर,.अनगर जि. प. चे अर्थ व बांधकाम समितीचे माजी. सभापती बाळासाहेब गिरमकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी जितुशेठ मगर यांनी विविध झाडांची रोपे देऊन उपस्थितांचे स्वागत केले. केशवभाऊ मगर यांनी प्रास्ताविक केले.मा. जि. प सदस्य बाळासाहेब गिरमकर यांनी आभार मानले.सार्वजनिक कार्यक्रमात महिलांचा सहभाग वाढावा : वेलणकरहॉटेल योगराज लॉजिंग-टेरेस गार्डेनचे उद््घाटन करताना सिनेअभिनेत्री मधुरा वेलणकर. समवेत योगराज उद्योग समूहाचे प्रमुख केशवभाऊ मगर,ज़ितूशेठ मगर आदी










