भिंगार छावणी परिषद कार्यालयासमोर घरकुल वंचित स त्याग्रह; अहमदनगर ;केंद्र सरकारने घरकुल वंचितांसाठी जाहिर केलेली पंतप्रधान आवास योजनेत...
|
अहमदनगर ;केंद्र सरकारने घरकुल वंचितांसाठी जाहिर केलेली पंतप्रधान आवास योजनेत छावणी परिषदेच्या हद्दीतील घरकुल वंचितांसाठी धोरण स्पष्ट न केल्याने मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्यावतीने सोमवार दि. ८ ऑगस्ट रोजी भिंगार छावणी परिषदेच्या कार्यालयासमोर घरकुल वंचित सत्याग्रह करण्यात येणार असल्याची माहिती अँड़ कारभारी गवळी यांनी दिली.
केंद्र सरकार शहराबरोबरच पंतप्रधान ग्रामीण आवास योजना लवकरच कार्यान्वीत करणार आहे. ग्रामीण भागात घरकुल वंचितांना घरे ग्रामसभेच्या माध्यमातून दिली जाणार असल्याची माहिती राज्य ग्रामीण मंत्रालयाचे उपसचिव व या योजनेचे प्रमुख विवेकानंद गुजर यांनी दिली आहे. यामुळे सरकारी अधिकारी व राजकिय पुढारी यांचा हस्तक्षेप न होता ग्रामीण भागातील खर्या लाभार्थींना घरे मिळण्यास मदत होणार आहे. परंतू शहर व ग्रामीण भागातील घरकुल वंचितांचा प्रश्न मिटत असताना छावणी हद्दीतील घरकुल वंचितांचा प्रश्न तसाच अस्तित्वात आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठी केंद्र सरकारने छावणी परिषदेच्या हद्दी संदर्भात धोरण स्पष्ट केले नाही. छावणी परिषदेच्या हद्दीत मोठ्या संख्येने घरकुल वंचित असताना ही योजना छावणी परिषद हद्दीत राबविण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे अँड़ गवळी यांनी प्रसिध्दीपत्रकात सांगितले आहे. आंदोलनात अँड़ गवळी, अशोक सब्बन, प्रा.सुदाम देवखिळे, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम, वीरबहादूर प्रजापती, सखाराम सरक, शाहिर कान्हू सुंबे, अंबिका नागूल, अंबादास दरेकर, अँड़ संजय जव्हेरी आदि सहभागी होणार आहे.
|










