शब्दगंधचे उपक्रम कौतुकास्पद : मरकड अहमदनगर; मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी साहित्य, कला आवश्यक असून, कविता हे व्यक्त होण्याचे माध्...
शब्दगंधचे उपक्रम कौतुकास्पद : मरकड
अहमदनगर;

मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी साहित्य, कला आवश्यक असून, कविता हे व्यक्त होण्याचे माध्यम आहे. कविता लिहिणारे नवे-नवे कवी निर्माण व्हावेत, यासाठी शब्दगंध घेत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहते, असे मत कविवर्य गणेश मरकड यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्यावतीने आयोजित पावसाळी काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी ज्ञानदेव पांडुळे, बापूसाहेब भोसले, प्राचार्य शिवाजी देवढे, रामदास सोनवणे, अध्यक्ष राजेंद्र उदागे, शैलेंद्र भणगे, सुनील गोसावी उपस्थित होते. यावेळी श्रीरामपूर येथील आनंदा साळवे यांच्या 'वाटसरु' काव्यसंग्रहाचे प्रकाशन गणेश मरकड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या काव्य संमेलनात शर्मिला गोसावी, शुभम दुरगुडे, चंद्रकांत उदारे, सुलोचना गाडेकर, नांदूरकर जे.एस.वसंत डंबाळे, व.गो.जोशी, विनायक पवळे, मारुती सावंत, मनीषा गायकवाड, शांताराम खामकर, सचिन खरात, प्रा.डॉ.महावीरसिंग चोहान, स्वाती ठुबे, ऋता ठाकूर, प्रा.डॉ.अशोक कानडे, राजेंद्र उदागे, भगवान राऊत, राजेंद्र फंड, गणेश पोळ, मीरा आर्ले, अनिल पानखडे, अनिल चातुर, बबनराव गिरी, प्रतीक्षा गाडवे, दत्तात्रय बोडखे, सुनीता औताडे, नवृत्ती श्रीमंडिलकर, अण्णा संत, शामा मांडलिक, नंदकिशोर चंदनशिव यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले तर शेवटी भगवान राऊत यांनी आभार मानले. यावेळी हर्षल आगळे, देविदास आगरख, राजेंद्र पवार, ऋषिकेश राऊत, दिशा गोसावी, निखिल गिरी, वृषाली राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित सर्व मान्यवरांचा पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला.









