बट विद्यालयातील व्याख्यानमालेत स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन; अहमदनगर; भिंगार येथील श्रीमती अँबट मायादेवी गुरुदित्ताशाह विद...
बट विद्यालयातील व्याख्यानमालेत
स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन;
अहमदनगर;
![]()
भिंगार येथील श्रीमती अँबट मायादेवी गुरुदित्ताशाह विद्यालयात गुरुकुल प्रकल्पांतर्गत व्याख्यानमाला आयोजित केली होती. व्याख्यानाचा विषय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असा होता. डीआरडीचे जिल्हा लेखावित्त अधिकारी रमेश कासार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कासार म्हणाले, नोकरी म्हंटले की स्पर्धा परीक्षा शिवाय पर्याय नाही. त्यासाठी स्पर्धापरीक्षांची तयारी करण्यासाठी आतापासूनच तयारी करावी लागेल. विद्यार्थ्यांच्या अंगी नम्रता गुण असावा, कष्टाळू वृत्ती असावी, यशस्वी होण्यासाठी थोरामोठय़ांचा मान राखावा. स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या व्यक्तींचा इतिहास पाहिल्यावर त्या ग्रामीण भागातील असल्याचे लक्षात येते. प्रतिकुल परिस्थितीत स्वत:च्या कर्तृत्वावर ते मोठे झाले, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी ध्येय उच्च ठेवावे, जिद्दी असावे, ग्रामीण भागातील मुलांमध्ये भरपूर उर्जा असते. तिचा सद्पयोग करावा, एमपीएससी, युपीएससी तयारी आतापासूनच करावी व ते वर्तमानपत्र रोज वाचा, कात्रणे, टिपणे करा, स्कॉलरशीप स्पर्धा परीक्षांचा पाया आहे, म्हणून त्याकडे लक्ष द्यावे. पुष्पा काळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भाऊसाहेब दळवी यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. मुख्याध्यापक एकनाथ जगताप, पर्यवेक्षक भाऊसाहेब दळवी यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले. पाराजी भांड, प्रतिभा देशमुख, वर्षा साठे उपस्थित होते. अतुल चव्हाण यांनी आभार मानले.
|










