खेळामुळे व्यक्तिमत्व विकास घडतो :घाडगे ढोरजळगावने, ता. शेवगाव येथील ठकुबाई हरिभाऊ घाडगे विद्यालयात पावसाळी खो खो क्रीडा स्पर्धेचे ...
खेळामुळे व्यक्तिमत्व विकास घडतो :घाडगे

ढोरजळगावने, ता. शेवगाव येथील ठकुबाई हरिभाऊ घाडगे विद्यालयात पावसाळी खो खो क्रीडा स्पर्धेचे उद््घाटन करताना हभप मुरलीधर विधाटे व संस्थापक मेजर साहेबराव घाडगे, गणोश कराड आदी
)ढोरजळगाव/ - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा, यासाठी सांघिक खेळाला मोठे महत्व असून, खेळामुळे व्यक्तिमत्व विकास घडतो. ज़ो खिलाडूवृत्तीने खेळतो, तो आयुष्यात निश्चित यशस्वी होतो, भविष्यात खेळसंस्कृती, वृक्षसंस्कृती व जलसंस्कृती रुजवावी लागणार असल्याचे मत त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक मेजर साहेबराव घाडगे यांनी व्यक्त केले. ढोरजळगावने, ता. शेवगाव येथे वै ठकुबाई हरिभाऊ घाडगे माध्य विद्यालयात जिल्हा क्रीडा कार्यालय व पंचायत समिती शेवगाव अंतर्गत तालुकास्तरीय शालेय कबङ्ङी स्पर्धेचे उद््घाटन घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी सरपंच लक्ष्मण ङोळस, उपसरपंच गणोश कराड, आनंता उकिर्डे, हभप मुरलीधर विधाटे, प्रा. आनंदराव घाडगे, सोपान काळे, पंडित, भाऊ घाडगे, घाडगे एम.बी., पंचायत समितीचे पोफाळ सर नारायण कराड, पोपट काळे आदी उपस्थित होते. या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत शेवगाव तालुक्यातील शाळा मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. क्रीडा शिक्षक शिवाजी वाबळे व कैलास नजन यांचे मार्गदर्शन लाभणार आह. सूत्रसंचालन रेखा साबळे व राम काळे यांनी केले. आभार श्रीराम बडे यांनी मानले









