निर्मलनगर रस्त्यावरील पूल भीज पावसामुळे खचला. अहमदनगर; सावेडी उपनगरातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या निर्मलनगर रस्त्यावरी...
निर्मलनगर रस्त्यावरील पूल भीज पावसामुळे खचला.

अहमदनगर;
सावेडी उपनगरातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या निर्मलनगर रस्त्यावरील भगवान बाबा चौकातील पुलाचा काही भाग पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे खचला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या पुलाच्या खचलेल्या भागाची पाहणी केली असून, महापालिकेच्या अधिकार्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून त्याची माहिती दिली आहे. या खचलेल्या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी निवेदनाद्वारे केली आहे.
भीज पावसामुळे दोन दिवसांपासून शहरात सर्वत्र पाणीबाणी झाले आहे. शहरातील गटारी व नाले पावसाच्या पाण्यामुळे तुडूंब वाहत आहेत. भाजी पावसामुळे ओलावा वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणीचा भाग खचत आहेत. निर्मलनगर येथील पुलाचा खचलेला भाग हे देखील त्यातील एक कारण आहे. या पुलावर नेहमीच मोठी वाहतूक होते. जड वाहनांची संख्या देखील यात आहे. शहरातील बस, रिक्षा, ट्रक, दुचाकी व इतर वाहनांचा त्यात समावेश आहे. त्यात पुलाचा काही भाग खचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या पुलाला मोठा धोका होण्याअगोदर त्याची दुरुस्तीची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. महापालिकेच्या अधिकार्यांना त्यासंदर्भातील पत्रव्यवहार करण्यात आला आहे. या पुलाखाली मोठय़ाप्रमाणात कचरा आणि दगड असल्याने प्रवाहाला अडथळा होत होता. स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी तो दूर केल्यानंतर पुलाखाली साचलेले पाणी वाहते झाले. महापालिकेच्या कर्मचार्यांची याकामी मोठा पुढाकार घेतला. डॉ. विलास शिरसाठ, सुधीर जायभाय, शिवाजी भोसले, बबन नागरे, रामदास जाधव, सागर अवसरे, विष्णु गायकवाड, सुरेश रोकडे, अजय हिवाळे, सागर गवळी, अजय जाधव आदी उपस्थित होते.निर्मलनगर रस्त्यावरील पूल भीज पावसामुळे खचला.









