शिक्षक भारती'चा सरकारविरोधात एल्गा र शनिवारी आंदोलन : पगारासह, थकीत अनुदानाची मागणी अहमदनगर : शिक्षकांच्या पगारासह अन्य प्रश्ना...
अहमदनगर : शिक्षकांच्या पगारासह अन्य प्रश्नासंदर्भात शनिवारी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या प्रश्नावर संघटनेचे हे राज्यव्यापी आंदोलन असल्याची माहिती संघटनेचे सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
शिक्षकांचे विविध प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत. यात शिक्षकांचे पगार प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला व्हावे. २८ ऑगस्ट २0१५ चा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, वस्ती शाळा शिक्षकांची जुनी सेवा ग्राह्य धरण्यात यावी. शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या तत्काळ मिळाव्यात. बाहेरच्या जिल्ह्यातून बदली होणार्या शिक्षकांना तत्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावे, आश्रमशाळेवर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे काम नाही, वेतन नाही हे धोरण बंद करावे. या शिक्षकांना तातडीने पगार सुरू करावेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थी संख्या २५ ठेवावी, शिक्षकेतर कर्मचार्यांचा आकृतीबंध करण्यात यावा. शिक्षकांसाठी कॅशलेस विमा योजना सुरू करावी, रात्रशाळांना नियमित शाळांचा दर्जा देण्यात यावा, रात्रशाळा बंद करण्यात येऊ नये, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनात कार्याध्यक्ष अप्पासाहेब जगताप, राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे, मुकेश गडदे, सुनील मते, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, आशा मगर, मिनाक्षी सुर्यवंशी, संध्या गावडे, विभावरी रोकडे, शकुंतला वाळुंज, शैला कुटीनो, जितेंद्र आरू, सुधीर शेगडे, प्रदीप रुपटक्के, संभाजी चौधरी, विलास गागडे सहभागी होणार आहेत.










