Archive Pages Design$type=blogging

घाटघर, रतनवाडीला भूस्खलन

घाटघर, रतनवाडीला भूस्खलन; २५ शेतकर्‍यांच्या भातशेतीचे नुकसान : दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प रस्त्यावर आलेला भराव जे.सी.बी.च्या सहा...


घाटघर, रतनवाडीला भूस्खलन;
२५ शेतकर्‍यांच्या भातशेतीचे नुकसान : दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
रस्त्यावर आलेला भराव जे.सी.बी.च्या सहाय्याने बाजूला करण्यात आला. जि.प.चे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. रिंगरोड भागात रतनवाडी कोलटेंभे येथे अतवृष्टी झाली, सोमवारी रात्री ४८४ मिलीमिटर पाऊस कोसळला. यामूळे दरड कोसळून भूस्खलन झाले आहे. भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकर्‍यांची शेती नामशेष झाली आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे होऊन शेतकर्‍यांना मदत मिळावी.
- अशोक भांगरे, माजी जि. प. अध्यक्ष अकोले : दुर्गम आदिवासी भागातील घाटघर-रतनवाडी परिसराला अतवृष्टीचा फटका बसल्याने काही ठिकाणी भूस्खलन होऊन २५ शेतकर्‍यांच्या भातशेतीचे नुकसान झाले. 
कोलटेंभे, रतनवाडीदरम्यान बुळे आणि पवार यांच्या डोंगरशेतीजवळ मंगळवारी सकाळी भूस्खलन झाल्याने जवळपास २५ शेतकर्‍यांच्या भात शेतीचे नुकसान झाले, तर मुरशेत येथे मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर दरड कोसळल्याने घाटघरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. बुधवारी सायंकाळी जे.सी.बी.च्या साहाय्याने रस्त्यावरचा राडा बाजूला करुन वाहतूक पूर्ववत करण्यात आली. 
भूस्खलन व बांध फुटीमूळे भात शेतीचे नुकसान झाले असून काही ठिकाणी भात पीक मातीने गाडले गेले तर काही भातखाचरातील आवणी केलेले रोपे वाहून गेल्याने आदिवासी शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे व पत्रकारांनी या भंडारदरा पाणलोटातील रिंग रोड भागास भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. कोलटेंभे-रतनवाडी दरम्यान मंगळवारी १९ इंच पाऊस कोसळल्याने पवार यांच्या शेताजवळ डोंगरटेकडीचे भूस्खलन झाले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: घाटघर, रतनवाडीला भूस्खलन
घाटघर, रतनवाडीला भूस्खलन
http://epaper.lokmat.com/EpaperImages//ngr//582016//d17113-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_74.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_74.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago