टँकर बंद केल्याने जि.प.स्थायी समिती सभेत सदस्यांची प्रचंड नाराजी; अहमदनगर ; जिल्हा परिषदेची स्थायी समिती व जलव्यवस्थापन व स्वच...
टँकर बंद केल्याने जि.प.स्थायी
समिती सभेत सदस्यांची प्रचंड नाराजी;
अहमदनगर ;

जिल्हा परिषदेची स्थायी समिती व जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा पंचायत समिती अकोले येथील सभागृहात अध्यक्षा मंजुषाताई गुंड पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.
सभेच्या सुरुवातीस महाड व कोपर्डी येथील झालेल्या घटनांबाबत शोक प्रस्ताव पारीत करुन श्रद्धांजली वाहण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुका वगळता इतर तालुक्यात अद्याप पुरेसा पाऊस झाला नाही. पिण्याच्या पाण्याच्या उद्भवाच्या विहिरींमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाली नाही. असे असताना शासनाने नगर जिल्ह्यात चालू असलेले ३0५ टॅँकर ३१ जुलै २0१६ पासून बंद करण्यात आल्याबद्दल सभेने तीव्र नाराजी व्यक्त करुन जिल्ह्यात सुरु असलेले ३0५ टॅँकर पूर्ववत सुरु करावे अशी मागणी करण्यात आली. पाणी पुरवठय़ाच्या टॅँकरबद्दल टॅँकर मंजूर खेपा होत नाहीत, न झालेल्या खेपा पुन्हा करण्यात येत नाही. इत्यादी तक्रारी सभेमध्ये करण्यात आल्या. टॅँकर सुरु करताना जी कार्यपद्धती अवलंबविली जाते तीच कार्यपद्धत टॅँकर बंद करताना अवलंबविण्यात यावी, अशी मागणी सभेत करण्यात आली. या विषयाकडे शारदाताई भोरे यांनी लक्ष वेधले. या बाबत सुभाष पाटील, सुजित पाटील, राजेंद्र फाळके, बाळासाहेब हराळ, इत्यादींनी सूचना करुन या बाबत जिल्हा परिषदेची सभा बोलवावी अशी मागणी करण्यात आली.
समाजकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत कामाच्या मान्यता, निधीची, उपलब्धता, निधीचे वितरण या बाबतचा आढावा घेऊन योजनेतील कामांना सर्वोच्च प्राधान्याने मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी हराळ यांनी केली आहे
| . जी.एस.टी चे धोरण लवकरच लागू होणार असल्याने जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उत्पन्नावर काय परिणाम होणार आहे. याचा अभ्यास करुन माहिती सभेस देण्यात यावी अशी मागणी राजेंद्र फाळके यांनी केली. गुंडेगावला उत्कृष्ट काम केल्याब्द्दल राज्यस्तरीय वन विभागाचा पुरस्कार मिळाल्याब्द्दल हराळ यांचे अभिनंदन करण्यात आले. विषारी गवत खाल्याने जिल्ह्यात पुशुधनांना विषबाधा होऊ पशुधन दगावत असलेच्या घटना घडत आहेत. या बाबत प्रतिबंधात्कमक उपाय योजना राबविण्यात याव्यात याबाबत शेतकर्यांनी घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती करुन मार्गदर्शन करावे, असे सभापती शरद नवले यांनी केली. पावसाळ्यात ग्रामीण भागात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत असून, यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हाभर विशेष मोहीम राबवावी अशी मागणी फाळके, पाटील, हराळ यांनी केली. या स्थायी समिती सभेस उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार विषय समित्यांचे सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले,मिराताई चकोर, नंदाताई वारे तसेच स्थायी समिती सदस्य रजेंद्र फाळके, बाळासाहेब हराळ, सुजित झावरे पाटील, कैलासराव वाकचौरे, सुवर्णाताई निकम व जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीचे सदस्य सुभाष पाटील, सुनील गडाख, शारदाताई भोरे, विशेष निमंत्रीत सदस्य केशवराव भवर तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी रवीद्र बिनवडे , मा. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, सभेचे सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) पी.एस. शिर्के व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते |









