) : राजस्थानी युवा मंचचे महापौर व उपमहापौर यांना निवेदन आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मार्गावरील पार्किंग अनधिकृत ! .अहमदनगर ; अल्पद...
) :
राजस्थानी युवा मंचचे महापौर व उपमहापौर यांना निवेदन
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मार्गावरील पार्किंग अनधिकृत !
.अहमदनगर ;

अल्पदरात रुग्णसेवा देत असताना ही पार्किंगची वसुली त्रासदायक ठरत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
ही जागा पार्किंगसाठी देताना शहर वाहतूक शाखेची परवानगी देखील घेतली गेली नसल्याचे दिसत आहे. म्हणजेच मनमानीपद्धतीने ही वसुली सुरू असल्याचे दिसते आहे, असे देखील निवेदनात म्हटले आहे. बाहेरगावच्या लोकांची तर येथे लूट होत असल्याच्या तक्रारी देखील आहेत, असे म्हटले आहे.
महापौर सुरेखा कदम व उपमहापौर श्रीपाद छिंदम यांना निवेदन देताना नगरसेवक सुवेंद्र गांधी, पोपट कटारिया, संपत नलवडे, धनेश कोठारी, अनिल कटारिया, अमित मुथा, कमलेश भंडारी, अरुण दुग्गड, पोपट कटारिया, राजकुमार बोरा, धनराज संचेती, राजेंद्र ताथेड, जितेंद्र नहार, कचरदास लुंकड, प्रशांत मुथा, सचिन कटारिया आदी यावेळी उपस्थित होते.नगररचना कार्यालयाच्या जागेचा गैरवापर?
दरम्यान, जागा ही मूंर विकास योजनेतील मंजूर नगररचना योजना क्रमांक तीनमधील १८.२९ मीटर रस्त्यांपैकी व मंजूर रेखांकनातील नऊ मीटर रस्त्यापैकी आहे. त्यामुळे सदर जागा रस्त्यांपैकी असल्याने ती पार्किंग व्यवसायासाठी देता येणार नाही. असा स्पष्ट अभिप्राय नगररचना विभागाचा असताना सदरची जागा महानगरपालिकेने कराराने दिलेली आहे, असे देखील निवेदनातून समोर आणण्यात आले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे
यश पॅलेस ते चाणक्य चौक आणि आनंदऋषीजी हॉस्पिटल ते माणिकनगर येथील गुगळे बंगला परिसरातील रस्त्यावर भाडेतत्त्वावर असलेला पार्किंगचा ठेका रद्द करावा, अशी मागणी नम्रता परिवार व सकल राजस्थानी युवा मंचाने केली आहे. महापौर सुवर्णा कदम आणि उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
पार्किंग ज्या रस्त्यावर आहे, तेथे नावाजलेले आनंदऋषीजी हॉस्पिटल आहे. येथे अल्पदरात रुग्णांना सेवा दिली जाते. यामुळे या हॉस्पिटलमध्ये राज्यासह देशभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे येथे सतत नागरिकांची गर्दी असते. रुग्णांना भेटण्यासाठी येणार्या नागरिकांची संख देखील आहे. यातच अशांकडून पार्किंगचे शुल्क आकारले जाते हे चुकीचे आहे.
पार्किंग आकारताना रुग्णाचे नातेवाइक आणि वसुली अधिकार्यांचे यातून वाद निर्माण होतात. रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्याची घाई असतानाच पार्किंगचे शुल्क वसुल करण्याची घाई होत असते. महापालिकेविषयी यातून रोष निर्माण होऊन बदनामी होते. आनंदऋषीजीच्या कार्याचीप्रेरणा घेऊन स्थापन करण्यात आलेल्या हॉस्पिटल अल्पदरात रुग्णसेवा देत असताना ही पार्किंगची वसुली त्रासदायक ठरत आहे, असे निवेदनात म्हटले आहे









