साईसंस्थानचा निधी देण्यास कोतेंचा विरोध ; साकुरी/प्रतिनिधी श्रीमंत देवस्थानांकडुन ५0 टक्के निधी वैद्यकीय खात्यासाठी वर्ग करण्यासंब...
साकुरी/प्रतिनिधी
श्रीमंत देवस्थानांकडुन ५0 टक्के निधी वैद्यकीय खात्यासाठी वर्ग करण्यासंबंधीचे पत्र वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. यात शिर्डी येथील साईबाबा संस्थानाचा देखिल समावेश आहे. महाजनांनी केलेल्या या मागणीचा शिर्डी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष निलेश कोते यांनी दर्शविला आहे.
देणगी स्वरुपात मिळालेल्या पैशावर आता मंत्री गिरीश महाजनाचा डोळा आहे. साईसमाधी शताब्दी सोहळा अवघ्या काही महिण्यांवर आला असताना,शिर्डीमध्ये साईभक्त विविध सुविधांपासुन वंचीत आहे. वेळोवेळी अश्याप्रकारे साईं संस्थानचा निधी शासनाने मागणे अतिशय चुकीचे आहे. शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे मनोरंजनात्मक उपाययोजना केलेली नसताना,साई संस्थानची असणारी अपुरी पाणीपुरवठा योजना,स्वच्छतेचा गंभीर प्रश्न,कचरा बाबतचा प्रश्?न कर्मचारी वगाचे असणारे प्रलंबित प्रश्न एक ना अनेक समस्या प्रलंबित असताना याउलट शासनाने शिर्डीच्या विकासासाठी निधीची पुर्तता करणे गरजेचे असल्याचे उपनगराध्यक्ष कोते यांनी सांगितले. सरकारने साईसंस्थानकडे निधी मागणे चुकीचे आहे.










