भुईकोट किल्ला परिसराची स्वच्छता ; अहमदनगर : स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईडच्यावतीने भुईकोट किल्ला परिसरात ...
भुईकोट किल्ला परिसराची स्वच्छता ;

अहमदनगर : स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईडच्यावतीने भुईकोट किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. भुईकोट किल्ल्यास भेट देण्यास आलेल्या नागरिकांनी केलेल्या कचर्याची स्वच्छता क्लबच्या सदस्यांनी केली.
यावेळी क्लबचे अध्यक्ष मनयोगसिंग माखिजा, सचिव अभिजीत भळगट, खजिनदार रवी तुमनपेल्ली, सनी वधवा, गगनकौर वधवा, हरमीतकौर माखिजा, कमलेश चुत्तर, डॉ.रोहित धूत, बलजीतसिंग बीलरा, डॉ.संजय असनानी आदी उपस्थित होते.
किल्ला परिसरात फिरण्यास आलेल्या नागरिकांना स्वच्छतेसाठी क्लबच्या वतीने आवाहन करण्यात आले. स्वच्छता मोहिमेत इतर स्वयंसेवी संघटना व नागरिकांनी सहभाग नोंदवला. हिराबाई सुर्यवंशी शाळेत लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईडच्यावतीने ध्वजारोहण करुन विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. क्लबच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण व गरजू मुलांच्या शिक्षणासाठी चालू असलेल्या उपक्रमाची माहिती मनयोगसिंग माखिजा यांनी दिली. शाळेचे संचालक गणेश गरड व पठाण सर यांनी स्वागत केले.









