फुगे बनवणार्या गॅसटाकीचा स्फोट; जामखेड शहरात नागपंचमी महोत्सवाची तयारी चालू असतानाच कार्पेटचा गॅस जास्त भरण्यात आल्याने टाकीचा जो...
फुगे बनवणार्या गॅसटाकीचा स्फोट;

जामखेड
शहरात नागपंचमी महोत्सवाची तयारी चालू असतानाच कार्पेटचा गॅस जास्त भरण्यात आल्याने टाकीचा जोरदार स्फोट होऊन टाकी शंभर ते तीनशे फूट उंचावर जावून निर्जन जागेवर पडल्याने मोठी जीवितहानी टाळली, मात्र टाकी ठेवलेल्या सायकलचा चक्काचूर झाला आहे. या प्रकरणी फुगे विकणार्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला पोलिस नाईक संजय राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, दि ७ रोजी सकाळी साडे सात ते आठच्या दरम्यान खर्डा चौकातील उमर भाई कुरेशी यांच्या मालकीचे उमरखय्याम खानावळ समोरील मोकळ्या जागेत गॅसचे फुगे विकणारा निर्मलकुमार कन्हयालाल कमल,रा,बडीथालपूर, ता बिल्लोड, जि. कानपूर उत्तर प्रदेश ( वय २0 ) हा फुग्यात गॅस भरण्यासाठी कार्पेट टाकीत भरत होता . मात्र टाकीत प्रमाणापेक्षा जास्त गॅस तयार झाल्याने टाकीचा जोरदार स्फोट झाला .या नंतर मोठा आवाज होऊन टाकी दोनशे फूट उडून निर्जन स्थळी जाऊन पडली. सदर गॅसचे फुगे विकणारा निर्मलकुमार कमल याने मनुष्यप्राण्यास धोका होईल अगर नुकसान होईल, हे माहीत असूनही फुग्यात गॅस भरण्याची स्फोटके बाळगून व त्याचा स्फोट घडवून. स्वत:ची सायकल आणि उमरखय्याम खानावळीच्या काचेचे नुकसानास कारणीभूत झाल्याने त्याचेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांनी तात्काळ भेट दिली. हे.कॉ रॉबिन मसिहा पोलिस नाईक साईनाथ टेमकर, पोलिस नाईक संजय राठोड,पोलिस नाईक संदीप तागड, गणोश साने, या पथकाने अपघातग्रस्त जागेची पहाणी केली. तसेच तहसीलदार सुशील बेल्हेकर, पोलिस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी या घटनेची माहिती मिळताच भेट देऊन पाहणी केली









