अंत्ययात्रेला करून दिली वाट मराठय़ांचा महामोर्चा! कोपर्डीच्या निषेधार्थ अडीच लाखांचा जनसागर रस्त्यावर; : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्ड...
अंत्ययात्रेला करून दिली वाट
मराठय़ांचा महामोर्चा!
: अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. ९) दुपारी १ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर अडीच लाख मराठय़ांचा महामोर्चा धडकला. सर्वपक्षीय मराठा कार्यकर्त्यांबरोबर विविध क्षेत्रांतील सहभागी समाजबांधवांनी शिस्त, शांततेचा अवलंब करीत आदर्श आंदोलनाचे दर्शन घडविले. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात १३ जुलै रोजी अल्पवयीन मराठा मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. तिच्या मृतदेहाशी अमानुष कृत्य करण्यात आले.या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तपासात गती नाही. अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. त्यामुळे मराठा समाजबांधवांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष घालून तीनही आरोपींवर निर्भया कायद्याप्रमाणे पुढील दोन आठवड्यांत अंतिम आरोपपत्र दाखल करावे, सहा महिन्यांत आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी, राज्यातीलशिस्त, शांतता, आदर्श आंदोलनाचे औरंगाबादेत दर्शनपान ४ वररावसाहेब दानवेंनी फिरवली पाठकोपर्डी घटनेचा निषेध सर्व स्तरातून होत आहे. त्यामुळे माजी मंत्री जयसिंगराव गायकवाड, आ. हर्षवर्धन जाधव, सतीश चव्हाण, माजी आ. कल्याण काळे, महापौर त्र्यंबक तुपे, आप्पासाहेब कुढेकर, प्रदीप सोळंके, बाळासाहेब सराटे, उद्योगपती मानसिंग पवार आदींसह हजारो राजकीय नेत्यांचा मोर्चात सहभाग होता. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांना देखील मोर्चाचे निमंत्रण होते, त्यांनी मात्र मोर्चाकडे पाठ फिरवली.मोर्चाच्या सुरुवातीलाच क्रांतीचौक पोलीस ठाण्याकडून एका दलित इसमाची अंत्ययात्रा आली. हे दृश्य मोर्चेकर्यांच्या नजरेस पडताच स्वयंस्फूर्तीने मराठा समाजबांधवांनी त्या अंत्ययात्रेला वाट करून दिली. अंत्ययात्रा निघून गेल्यानंतर मोर्चा पुन्हा विभागीय आयुक्तालयाच्या दिशेने मार्गस्थ झाला.










