कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनावर टीका भिंगारमधील लाभार्थी घरकुलापासून वंचित;l अहमदनगर; राज्यातील कॅन्टोंन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील ...
कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनावर टीका
अहमदनगर;
राज्यातील कॅन्टोंन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांना अंदमान-निकोबारसारखी सावत्र भावाची वागणूक दिली जात आहे. भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिक घरकुलापासून वंचित आहे. केंद्र किंवा राज्य सरकारने कॅंटोन्मेंट हद्दीतील नागरिकांच्या राहणीमानाचा कधीच विचार केला नाही. त्यामुळे मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचे भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिससमोर मंगळवारपासून घरकुल वंचित सत्याग्रह सुरू केला आहे.
अँड़ कारभारी गवळी म्हणाले, महाराष्ट्रातील ग्रामीण भागात येत्या १५ ऑगस्टच्या प्रत्येक गावच्या ग्रामसभेत घरकुल वंचितांची निवड केली जाणार आहे. राज्यात किमान २८ लाख घरकुल वंचितांना घरे देण्याबाबतची कार्यवाही सुरु होणार आहे. याबाबत राज्याच्या ग्रामीण मंत्रालयाने १ ऑगस्ट रोजी आदेश जारी केले आहेत. परंतु भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये काहीएक हालचाल दिसून येत नाहीत, असे देखील ते म्हणाले.
नगर महापालिकेने ही मोहिम वेगाने सुरु केली आहे. त्यामुळे भिंगार येथील घरकुल वंचितांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. भिंगार येथील घरकुल वंचितांना या योजनेपासून दूर ठेवल्याची खंत यावेळी अँड़ गवळी यांनी व्यक्त केली. अंबादास दरेकर, शाहीर कान्हू सुंबे, प्रकाश थोरात यांच्यासह अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला. तस्लीमा पठाण, स्वाती शिरसूळ, सखुबाई बोरगे, अर्चना आढाव, अंबादास दरेकर, अशोक भोसले, अण्णा शिंदे, हिराबाई ग्याण्यापा, सुमन जोमद आदी उपस्थित होते










