शिक्षक पुरस्काराची नावे २५ पर्यंत होणार ; अंतिम जिल्हा पुरस्कारासाठी निवड होणार्या शिक्षकांचे काम खरोखर आदर्श आहे की नाही, हे त...
जिल्हा पुरस्कारासाठी निवड होणार्या शिक्षकांचे काम खरोखर आदर्श आहे की नाही, हे तपासण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड होणार्या शिक्षकाचे काम, शाळा, शाळेचा परिसर, विद्यार्थी, त्या ठिकाणी संबंधीत शिक्षकांने निर्माण केलेला लोकसहभाग याची खात्री करून पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे.
-अण्णासाहेब शेलार, उपाध्यक्ष, जि.प. ■ १४ प्राथमिक शिक्षक आणि २ केंद्रप्रमुखांनाही यावेळी पुरस्कार देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी ४ शिक्षकांचे प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत. यात एका महिला शिक्षकाचा समावेश ठेवण्यात आलेला आहे. यातून १00 गुणाच्या प्रश्नपत्रिकेत अधिकाधिक गुण मिळवणार्या शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. अहमदनगर : जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणार्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे ५ सप्टेंबरला वितरण होणार आहे. या पुरस्कारासाठी पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. पुरस्कारार्थी निवडीसाठी १00 गुणांची प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली असून ५ सप्टेंबरपर्यंत तालुकास्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिले आहेत.
यंदा शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणार्या पुरस्कारासाठी शिक्षण विभागाने तयार केलेल्या १00 गुणांच्या प्रश्नावलीत बदल केलेला आहे. यंदापासून जिल्हा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवणार्या शिक्षकांना प्रगत शाळा उपक्रम, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या नवीन विषयांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा नसल्याने शिष्यवृत्तीचा विषय यातून वगळण्यात आलेला आहे.
पुरस्कारासाठी इच्छुक असणार्या शिक्षकांची सेवा, अनुभव, शैक्षणिक पात्रता, वैयक्तिक काम, अन्य शैक्षणिक अर्हता, तांत्रिक शैक्षणिक कामगिरी, कृती संशोधन, सामाजिक आणि राष्ट्रीय कार्याचा यात उल्लेख करण्यात येणार आहे.
पुरस्काराची प्रश्नावली तयार करण्यासाठी जिल्हा परिषदस्तरावर समिती गठीत करण्यात आली होती. यात शिक्षणाधिकारी कडूस, गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड, विस्तार अधिकारी उज्ज्वला गायकवाड, विस्तार अधिकारी एस. एम. ढवळे, अभय वाव्हळ, मनिषा कुलट, केंद्रप्रमुख लक्ष्मण औटी, रामदास मोरे, शिक्षक विक्रम आडसूळ, संदीप वाकचौरे यांचा यात समावेश होता.
५ ऑगस्टपर्यंत तालुका पातळीवर शिक्षकांना प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. त्यानंतर १0 ते २0 ऑगस्ट दरम्यान, पुरस्कार निवड समिती आलेल्या प्रस्तावाची तपासणी करणार आहेत. साधारण २५ तारखेपर्यंत जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड अंतिम करण्यात येणार असल्याचे कडूस यांनी सांगितले










