वांबोरी चारीला पंधरा दिवसांत पाणी : आ. कर्डिले पाथर्डी, नगर, राहुरी तालुक्यातील ४५ गावांतील १0२ पाझर तलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या...
वांबोरी चारीला पंधरा दिवसांत पाणी : आ. कर्डिले
पाथर्डी, नगर, राहुरी तालुक्यातील ४५ गावांतील १0२ पाझर तलावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या वांबोरी चारीला येत्या पंधरा दिवसांत पाणी सोडले जाणार असल्याची माहिती आ. शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे.
आ. कर्डिले यांनी नुकतीच मुंबई येथे पाटबंधारेमंत्री ना. गिरीश महाजन यांची पालकमंत्री ना.राम शिंदे व आ.बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह भेट घेवून वांबोरी चारीला पाणी सोडण्याची मागणी केली. तसेच मुळाधरणावरील वांबोरी चारीचे बिघाड झालेले दोन ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्यासाठी औरंगाबाद येथे पाठवण्याच्या सूचना दिल्या. तसेच वीजकपातीचे थकीत एक कोटी तीस लाख रुपये मदत व पूनर्वसनमधून शासनाने भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सहमती दर्शविली आहे. यामध्ये कर्मचार्यांचा पगार, वीजबील इतर देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. आठ दिवसात ट्रान्सफार्मर औरंगाबाद येथून दुरुस्त होऊन आल्यानंतर लगेच वीज कनेक्शन जोडून पाणी सोडले जाणार आहे. यासाठी आ. कर्डिले यांनी सातत्याने ना. महाजन, जलसंधारण मंत्री ना. राम शिंदे यांची भेट घेऊन या वांबोरी चारीच्या पाण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळेच यावर्षी या वांबोरी चारीला पाणी मिळण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
ज्या भागाची आणेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्या ठिकाणचे वीजबील शासन भरणार असल्याने वांबोरी चारीच्या वीजबिलाचा ८0 लाखांचा प्रश्न निश्चित मार्गी लागणारअसून पंधरा दिवसात पाणी सोडले जाईल, असे आ. कर्डिले यांनी सांगितले










