भीमानदीवरील पुलाचे ऑडिट होणो गरजेचे : डॉ.सौ. पाचपुते नगर -दौंड रस्त्यावरच्या भीमानदीवरील पुलाची,खड्डयांची पाहणी करताना सौ. प्र...
भीमानदीवरील पुलाचे ऑडिट होणो गरजेचे : डॉ.सौ. पाचपुते
![]()
नगर -दौंड रस्त्यावरच्या भीमानदीवरील पुलाची,खड्डयांची पाहणी करताना सौ. प्रतिभा बबनराव पाचपुते. समवेत कुंडलिकराव भोसले, बाळासाहेब करनोर, गणपत परकाळे, सरपंच संदीप कलगुंडे, उपसरपंच मारुती शिंदे, विजय लवांडे, गणोश भोसले, ग्रामविकास अधिकारी गोरे, तलाठी भावसार, लबडे, आदी-
महाड येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी नगर-दौंड रोडवरील निमगाव खलू येथील भीमानदीवरील पूल व रेल्वे पुलांचे स्पेशल ऑडिट होणे गरज़ेचे आहे,असे मत जि.प सदस्या डॉ. सौ. प्रतिभा बबनराव पाचपुते यांनी व्यक्त केले. नगर- दौंड रस्त्यावरील भीमानदी येथील पुलाला तडे गेलेले असून, जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलाच्या साईडला भक्कम तटबंदी केलेली नसल्याने या पुलाची आज काष्टी जि.प गटाच्या सदस्या डॉ.सौ.पाचपुते यांनी निमगाव खलू येथील ग्रामस्थ व अधिकारी यांच्यासमवेत पाहणी केली. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी सौ. पाचपुते म्हणल्या की, सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे तत्काळ स्पेशल ऑडिट करणो गरजेचे आहे. तसेच विशेष करून दौंड - मनमाड रेल्वे मार्गावरील भीमानदी येथील रेल्वे पूल हा ब्रिटिश काळातील असून, या पुलाची मुदत संपून गेलेली आहे, असे पत्र ब्रिटिश सरकारने केंद्र शासनास यापूर्वीच पाठविलेले आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे या दोन्ही पुलांचे तातडीने स्पेशल ऑडिट केल्यास भविष्यात होणारी संभाव्य दुर्घटना टळेल.
|










