नगर अर्बन बँकेत एटीएम कार्ड वितरण; अहमदनगर ; एटीएम कार्ड बद्दल माहिती देताना शाखाधिकारी बल्लाळ म्हणाले, अर्बन बँक मल्टिस्टेटने ...
नगर अर्बन बँकेत एटीएम कार्ड वितरण;
अहमदनगर ;

एटीएम कार्ड बद्दल माहिती देताना शाखाधिकारी बल्लाळ म्हणाले, अर्बन बँक मल्टिस्टेटने अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानयुक्त एटीएम कार्ड व डेबीट कार्ड सुरु केले आहे. एटीएम कार्डवर एटीएम धारकाचे छायाचित्र असल्याने हे एटीएम कार्ड फोटो आयडी म्हणूनही वापरता येणार आहे. तसेच संपूर्ण भारतात कुठल्याही बँकेच्या एटीएम मशिनद्वारे या कार्डचा वापर करता येणार आहे. या आधुनिक एटीएम कार्डचा बँकेच्या सर्व सभासद ठेवीदार व खातेदारांनी उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नगर अर्बन मल्टिस्टेट बँकेने नुकतीच आपल्या एटीएम कार्ड सेवेस सुरूवात केली आहे. बँकेच्या सावेडी शाखेमध्ये सभासदांना व ठेवीदारांना सौ.माधुरी याडकिकर व शिरीष खराडकर यांना बँकेचे सहा.व्यवस्थापक राजेंद्र मुनोत यांच्या हस्ते एटीएम कार्ड देण्यात आले. यावेळी बँकेचे शाखाधिकारी हेमंत बल्लाळ, शशिकांत खिस्ती, राजेंद्र बिदे, राहुल साळूंके, अशोक बेल्हेकर, श्रद्धा कुलकर्णी, प्रीती फिरोदिया, स्नेहल शिंगटे आदि अधिकारी उपस्थित होते.









