काळ्या पैशाच्या समूळ उच्चाटनासाठी जनसंसद मजबूत करावी : हजा रे पारनेर विविध राजकीय पक्ष, अधिकारी आणि माफिया यांची युती हेच काळ्या पैशाच्या ...
काळ्या पैशाच्या समूळ उच्चाटनासाठी जनसंसद मजबूत करावी : हजारे पारनेर ![]() विविध राजकीय पक्ष, अधिकारी आणि माफिया यांची युती हेच काळ्या पैशाच्या निर्मितीचे मूळ असून, काळ्या पैशाच्या दृष्टचक्रातून देशाला बाहेर काढायचे असेल तर प्रभावी संघटनाद्वारे लोक जागृतीतून जनसंसद मजबूत करावी लागेल. असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. संविधान मोर्चा व भारतीय जनसंसदेच्या माध्यमातून आज राळेगणसिद्धी येथे कार्यकर्त्यांची राज्यस्तरीय बैठक झाली. त्यावेळी अण्णा बोलत होते. या बैठकीसाठी माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत, विजय पांढरे, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे सचिव अशोक सब्बन, प्रा. बालाजी कोंपलवार, डॉ. शिवनाथ कुंभारे, प्रभाकर कोंढाळकर, मारुती कुंभार, उन्मेश बागवे, सुभाष भोसले यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले सुमारे पाचशे कार्यकर्ते उपस्थित होते. संविधान मोर्चा व भारतीय जनसंसदेमार्फत काळ्या पैशाविरुद्ध आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. त्यानिमित्त राज्यव्यापी जनजागृती अभियानाचा शुभारंभ या बैठकीत करण्यात आला. यावेळी अण्णांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, काळा पैसा हा देशाच्या विकासातील मोठा अडसर असून, त्या विरोधात जन आंदोलन करण्यासाठी व्यापक संघटन उभे करावे लागेल. असे संघटन उभे करताना शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात थोडासा त्याग आणि अपमान पचवण्याची शक्ती असेलेल्या कार्यकर्त्यांची गरज आहे. काळा पैसा रोखण्यासाठी एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याबरोबरच नागरिकांना एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जवळ बाळगण्यास प्रतिबंध करावा आणि केवळ बँकिंग व्यवहारास प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी यावेळी अण्णांनी केली |










