अमृत व अद्वैत स्वरूपाचे ज्ञान गीतेमध्ये : भोंग अहमदनगर ; अमृतमयी व अद्वैत स्वरूपाचे ज्ञान भगवतगीतेमध्ये समाविष्ट असल्यान...
अमृत व अद्वैत स्वरूपाचे
ज्ञान गीतेमध्ये : भोंग
अहमदनगर ;
![]()
अमृतमयी व अद्वैत स्वरूपाचे ज्ञान भगवतगीतेमध्ये समाविष्ट असल्याने सर्वांनी भगवतगीता वाचून आत्मसात करावी, असे आवाहन भगवतगीतेचे गाढे अभ्यासक व नवृत्त कॅप्टन सूर्यकांत भोंग यांनी केले. अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित भगवतगीता महात्म्य या विषयावर ते बोलत होते. महासंघाचे अध्यक्ष एन. डी. कुलकर्णी, सचिव आदिनाथ जोशी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर करवंदे, इंजि. आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष मकरंद देशपांडे, पुष्पा चितांबर, कार्याध्यक्ष प्रकाश वसगडेकर आदी उपस्थित होते.
भोंग म्हणाले, गीतोपदेश केल्यानंतर मिळणारे फळ आत्मसात केले, तर थेट मोक्ष प्राप्ती होते. मानवजातीच्या कल्याणासाठी स्वत: भगवान नारायणांनी संदेश रूपाने सांगितलेली गीता महान ऋ षी वेद, व्यासांनी ही भगवतगीता लिहिली आहे. ब्राह्मण बहुभाषिक महासंघाने भगवतगीतेवरील व्याख्यानाचे देखील त्यांनी कौतुक केले. मकरंद देशपांडे यांनी सत्काराबद्दल आभार मानले. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. पुष्पा चितांबर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश वसगडेकर यांनी आभार मानले.
|










