शतप्रतिशत पेरण्या पूर्ण; ■ जिल्ह्यातील ऊस पिकाची सरासरी १ लाख २१ हजार असून सध्या जिल्ह्यात अवघ्या ७ हजार हेक्टरवर उसाचे पीक आहे. य...
शतप्रतिशत पेरण्या पूर्ण;

■ जिल्ह्यातील ऊस पिकाची सरासरी १ लाख २१ हजार असून सध्या जिल्ह्यात अवघ्या ७ हजार हेक्टरवर उसाचे पीक आहे. यात आडसाली पिकाचे प्रमाण ३ हजार ५२२, लागवड सुरू २६ हेक्टर, खोडवा ३ हजार ३९४ हेक्टर उसाचेपीक आहे. ११ हजार १९६ हेक्टरवर कांदा पीक, भाजीपाला पीक ७ हजार हेक्टरवर, ९३ हेक्टरवर फूल पिकाची पेरणी झालेली आहे. ■ भात पिकाचे अकोले तालुक्यात २ हजार ६१२ हेक्टरवर, बाजरी पिकाचे १ लाख ६८ हजार हेक्टर, मका १ लाख ६१ हजार हेक्टर, तूर ३0 हजार ५५८ हेक्टरवर, मूग ४१ हजार २६८ हेक्टरवर, उडीद ३१ हजार ४५४ हेक्टर, भुईमूग ६ हजार ६0९ हेक्टर, सूर्यफूल २३५ हेक्टर, सोयाबीन ६९ हजार ३७१ हेक्टरवर, कापूस १ लाख ९३ हजार हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत. अहमदनगर : वरूण राजा हसल्याने जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. अनेक भागात दमदार पाऊस झाला असला तरी भूगर्भातील पाणी पातळी वाढली नसली तरी खरीप हंगामासाठी नियोजनाच्या तुलनेत ११३ टक्के पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन, कापूस, भुईमूग, उडीद, तूर या पिकांनी सरासरी ओलांडली असून ५ लाख ९९ हजार हेक्टरचे नियोजन असतांना प्रत्यक्षात ६ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आशादायक स्थिती निर्माण झाली आहे. अर्धा जून कोरडा गेल्यानंतर जिल्ह्यात अनेक भागात आशादायक पाऊस होत आहे.
या पावसामुळे खरीप हंगामातील अनेक पिकांनी सरासरी ओलांडली आहे. गेल्या आठ दिवसात जिल्ह्यात अनेक भागात दमदार पाऊस होत असून अकोले तालुक्यात अतवृष्टीमुळे भात पिकाचे मात्र, नुकसान झाले आहे.
मुळा, भंडारदरा, निळवंडे यासह पुणे जिल्ह्यातून नगर जिल्ह्यातील दक्षिण भागाला शेतीला पाणी पुरवठा करणार्या धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
पावसाचे प्रमाणे जसजसे वाढत आहे, तसतसे पिकांच्या पेरणीची आकडेवारी वाढत आहे. झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकाची शाश्वती आली आहे









