आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या शिबिरात ११२ बालकांची तपा सणी अहमदनगर- श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिट...
अहमदनगर- श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ सेवा यात्रीतर्फे होमिओपॅथी, थॉयराइड व इतर हार्मोन्स विकार, त्वचा विकार शिबीराचा प्रारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला.
या शिबीरासाठी सुवालालजी व कमलाबाई गुगळे यांच्या स्मरणार्थ गुगळे परिवार (एसबीजी)चे सहकार्य लाभले. माजी महापौर अभिषेक कळमकर, शहर बँकेचे अध्यक्ष डॉ.विजय भंडारी, उद्योजक नरेंद्र बाफना, नगरसेवक विपुल शेटीया, होमिओपॅथी तज्ञ डॉ.शैलेश संचेती, आयोजक अभय गुगळे, अजित गुगळे, रोहन गुगळे, सोहन गुगळे, आशा मुनोत, कल्पना गुगळे, साधना गुगळे, सारिका गुगळे, सतीश लोढा, सुभाष मुनोत, डॉ.आशिष भंडारी, वसंत चोपडा उपस्थित होते.
या शिबिरात ११२ बाल रुग्णांची तपासणी करण्यात आली. अभिषेक कळमकर, डॉ. विजय भंडारी, साधना गुगळे यांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केले. डॉ. शैलेश संचेती यांनी रुग्णांची तपासणी केली. नेत्ररोग तपासणी शिबीर आज (गुरूवारी) होणार असून, नेत्रतज्ञ डॉ.संदिप राणो व डॉ.वर्धमान कांकरिया, डॉ.श्रृतिका कांकरिया तपासणी करणार आहेत. डॉ.आशिष भंडारी यांनी आभार मानले
|










