गुणोरे संस्थेची वार्षिक सभा ; गुणोरे ग्रामीण पतसंस्थेच्या वार्षिक सवर्साधारण सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्...
गुणोरे संस्थेची वार्षिक सभा ;

गुणोरे ग्रामीण पतसंस्थेच्या वार्षिक सवर्साधारण सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष केरभाऊ गोपाळे, उपाध्यक्ष बन्सी मेसे. जवळे : गुणोरे (ता.पारनेर) येथील ग्रामीण पतसंस्थेची सतरावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष केरभाऊ गोपाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सुरुवातीला महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष, सॉलिसिटर कै. गुलाबराव शेळके, पारनेर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती पोपटराव पवार यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. संस्थेचे सचिव राजेंद्र गोपाळे यांनी अहवालाचे वाचन केले.
गुणवंत विद्यार्थी सानिका गणपत बढे, निलेश यशवंत गोपाळे, सौरभ यशवंत गोपाळे, तनिष्क राजेंद्र गोपाळे यांचा संस्थेचे उपाध्यक्ष बन्सी मेसे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेस अण्णासाहेब बढे, कचर बोचरे, सेवा संस्थेचे सदस्य सुभाष खोसे, दादाभाऊ ढवळे, कुंडलिक बढे, माजी सरपंच तात्यासाहेब राऊत, माजी सरपंच मनसुख बढे आदी उपस्थित होते. सुभाष खोसे यांनी प्रास्ताविक केले. मोहन बढे यांनी आभार मानले









