रांगोळीतून रेखाटली भारतमाता बोधेगाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त बोधेगाव (ता. शेवगाव) येथील शिवाजी विद्यालयाने गावातून प्रभात फेरी काढ...
रांगोळीतून रेखाटली भारतमाता

बोधेगाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त बोधेगाव (ता. शेवगाव) येथील शिवाजी विद्यालयाने गावातून प्रभात फेरी काढली. ब्राईट पब्लिक स्कूलमध्ये रांगोळीतून भारतमातेचे चित्र रेखाटण्यात आले होते.
सरपंच प्रीती अंधारे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. माजी सरपंच रामजी अंधारे, विठ्ठल तांबे, बाळासाहेब घोरतळे, निर्मलाताई काटे, प्राचार्य बालाजी गायकवाड आदी हजर होते. बाजार समितीच्या आवारात उपसभापती सुधाकर तहकिक यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संचालक प्रल्हाद शिंदे, बप्पासाहेब पारनेरे, संभाजी तिडके, नंदकिशोर शिंदे, संतोष शिंदे, बापू मानूरकर, सहाय्यक सचिव राजेंद्र राजपुरे आदी हजर होते. खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल विकासराव घोरतळे यांचा सत्कार करण्यात आला.
आबासाहेब काकडे महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष डॉ अभय देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे, प्रदीप दानवे, रामजी अंधारे, प्रभाकर हुंडेकरी, विकास घोरतळे, सुभाष कुढेकर, प्राचार्य. डॉ. एम. के. फसले, प्राचार्य विकास गवळी, प्रा. कैलास पोटे, प्रा. भागवत राशीनकर आदी हजर होते.
ब्राईट फ्युचर पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. निलेश मंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. भारतमातेची रांगोळी रेखाटली होती. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राकेश गर्जे, केदारेश्वर साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे, मुख्याधापिका प्रतिभा गर्जे, हिना बागवान, मयुरी पवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. बोधेगाव जिल्हा परिषद शाळेत व ग्रामपंचायत कार्यलयातही स्वातंत्र्यदिन साजरा झाला.
सोनविहीर जि. प. शाळेत सरपंच मुक्ता विखे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपसरपंच कौसर बेग, ग्रामसेवक कंठाळे, मुख्याध्यापिका जाधव, शिक्षक थोरे, दिलीप विखे आदी हजर होते. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
(वार्ताहर)
| ||||||||||||











