भांबोरा प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी; अहमदनगर : कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे पोलिसांना झालेली मारहाण व त्यानंतर तेथे झालेल्या जाळ...
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे पोलिसांना झालेली मारहाण व त्यानंतर तेथे झालेल्या जाळपोळीच्या घटनेत वाळूतस्करांचा हात असून, या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे रिपाइंचे राज्य सचिव अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गायकवाड म्हणाले, भांबोरा जवळ असलेल्या दुधोडी येथील गायरान जमिनीवर विशिष्ट जमातीची वस्ती आहे. या जमिनीवरून तेथे वाद आहे. अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीची घटना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपींना ताब्यात घेतले. तेथील काही लोकांनी मात्र, आरोपींना आमच्या ताब्यात द्या असे म्हणत पोलिसांनाच मारहाण करत त्यांना डांबून ठेवले. या घटनेत तेथील पोलीस पाटलाचाही समावेश होता. निलंबित पोलिसांना पुन्हा सेवेत घ्यावे, जाळलेली घरे बांधून द्यावीत. या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी. सर्वपक्षीय व समविचारी संघटनांची बैठक घेऊन सामाजिक सलोखा कसा टिकून राहिल यावर प्रयत्न करावेत. पोलीस प्रशासनाने मुलींच्या संरक्षणासाठी तेथे तात्पुरत्या स्वरुपात महिला कॉन्स्टेबलची नियुक्ती करावी, अशी मागणी करणार असल्याचे गायकवाड म्हणाले.
|










