महापालिका प्रशासनाचे आवाहन : नादुरुस्त पाइपलाइनच्या दुरुस्तीकडे लक्ष पिण्याचे पाणी उकळून पिण्याची गरज;l अहमदनगर ; शहराला सध्या...
महापालिका प्रशासनाचे आवाहन : नादुरुस्त पाइपलाइनच्या दुरुस्तीकडे लक्ष
पिण्याचे पाणी उकळून पिण्याची गरज;l
अहमदनगर ;

शहराला सध्या सुरू असलेला पाणीपुरवठा हा पिवळट रंगाचा आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणक्षेत्रांमध्ये नवीन पाण्याची आवक झाली आहे. नव्याने सुरू असलेल्या पाणीपुरवठा हा आरोग्यास घातक ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून आणि थंड करून पिण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
धरणातून येत असलेले पाणी हे गढूळ आहे. तरी देखील ते शुद्ध करून घेतले जात असले, तरी त्यात पिवळटपणा कायम आहे. यातून नागरिकांनी घाबरून जाण्याचे आवश्यकता नाही. पाण्यात क्लोरीन आणि तुरटीची मात्रा वाढवून ते अधिक शुद्ध करण्याचा प्रय▪केला आहे. या दोन्ही औषधांचा मात्रा योग्य आहे. असे असले तरी नागरिकांनी पाणी उकळून आणि थंड करून पिणे आरोग्यास लाभदायक ठरणार आहे.
सध्याचे पाणी गढूळ असून, त्यातून आरोग्याल अपाय होईल, असे आजार होऊ शकतात. त्यातच शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन देखील काही ठिकाणी फुटल्या आहेत. या फुटलेल्या पाइपलाइनमध्ये गटारींचे पाणी जाऊन त्यातून अशुद्ध पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचे उपाय म्हणून पाणी उकळून त्यानंतर थंड करून पिण्याचे लाभदायक ठरणार आहे. गढूळ पाण्यामुळे पोटांचे आजार वाढण्याची भीती आहे. त्यातून अतिसारासारखा आजाराचा फैलाव होऊ शकतो. पटकी सारख्या आजाराला देखील पुन्हा डोकेवर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे देखील महापालिका प्रशासनाने म्हटले आहे. एखाद्या ठिकाणी जास्त दुषित पाणी येत असल्यास त्याची तक्रार तत्काळ प्रभाग अधिकार्यांकडे करण्याचे देखील सांगण्यात आले आहे. नागरिकांना पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन कुठे फुलेली असल्यास त्याची देखील माहिती









