शिवरस्ता खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन तिसगाव ; पाथर्डी तालुक्यातील डाळिंबाचे आगार म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध...
शिवरस्ता खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
तिसगाव ;
![]()
पाथर्डी तालुक्यातील डाळिंबाचे आगार म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या निवडुंगे गावातील राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ लगत बरडवस्तीकडे जाणारा शिवरस्ता आहे. त्या शिवरस्त्याची नोंद निवडुंगे गावच्या नकाशात आहे. परंतु रस्त्यालगत असणार्या काही शेतकर्यांनी रसत्यावर अतिक्रमण केले आहे.
त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे रस्त्याचा वापर करणार्या नागरिकांना मोठय़ा प्रमाणात त्रास होत आहे. तरी सदर शिवरस्ता त्वरीत खुला करावा अशी मागणी बरडवस्ती परिसरात राहणार्या नागरिकांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांना केली आहे.
निवेदनावर आसाराम ससे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच हरीभाऊ मरकड, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मरकड, माणिक सावंत, अँड़ आदिनाथ चोभे, अर्जुन मरकड यांच्या सह्या आहेत. निवडुंगा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत रस्ता खुला करणेबाबत ठराव केला आ
|










