दोषींवर कारवाई करण्याची मागणी एसटी वाहक वाघ यांच्या कुटुंबीयांचे इंटकचे अध्यक्षांकडून सांत्वन; अहमदनगर : पाथर्डी आगारातील वाहक...
दोषींवर कारवाई करण्याची मागणी
अहमदनगर :
पाथर्डी आगारातील वाहक सुनील वाघ यांच्या कुटुंबियांची भेट इंटक संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी घेतली. वाघ यांच्या कुटुबियांना पूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी संघटना पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. वाघ यांच्या आत्महत्येच्या चौकशीची माहिती घेण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी आणि विभाग नियंत्रक अशोक जाधव यांनी देखील छाजेड यांनी भेट घेतली. वाघ यांचा छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी करत या मागे असलेल्यांवर कारवाईची मागणी छाजेड यांनी यावेळी केली.
सुनील वाघ यांनी एक ऑगस्टला आत्महत्या केली. वाघ यांनी आत्महत्या वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून केली असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे एसटी कामगार आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. वाघ यांना फसवून त्यांच्याविरुद्ध बस तपासणीमध्ये खोट्या तक्रारी व्हायच्या. वाघ यांच्या पत्नी देखील पाथर्डी आगारात काम करायच्या. त्यांना देखील हा त्रास देण्यात येत होता. वरिष्ठ अधिकारी आणि संघटनेचे काही पदाधिकारी मिळून हा उद्योग करायचे असा आरोप छाजेड यांनी वाघ कुटुंबाची भेट घेतल्यानंतर केला. वाघ यांची सुरू असलेली खातेनिहाय चौकशी गेल्या सात महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यामागचे कारण देखील यातच दडले आहे असेदेखील छाजेड यांनी म्हटले. छाजेड यांनी वाघ कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांची भेट घेऊन घटनेतील तपासाला वेग देण्याची विनंती केली. विभाग नियंत्रक अशोक जाधव यांची देखील भेट घेऊन यातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. संघटनेचे सरचिटणीस डी. ए. लिपणे, नगर विभाग अध्यक्ष सुरेश चौधरी, सचिव दिनकर लिपाणे, राज्य पदाधिकारी राजेंद्र घुगे, हनीफ शेख, रामदास पालवे, संदीप बडे आणि विलास चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
देखील छाजेड यांनी म्हटले. छाजेड यांनी वाघ कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांची भेट घेऊन घटनेतील तपासाला वेग देण्याची विनंती केली. विभाग नियंत्रक अशोक जाधव यांची देखील भेट घेऊन यातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली. संघटनेचे सरचिटणीस डी. ए. लिपणे, नगर विभाग अध्यक्ष सुरेश चौधरी, सचिव दिनकर लिपाणे, राज्य पदाधिकारी राजेंद्र घुगे, हनीफ शेख, रामदास पालवे, संदीप बडे आणि विलास चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते










