Archive Pages Design$type=blogging

भगवान जिव्हेश्‍वर जन्मोत्सवानिमित्त शहरातून पालखी मिरवणूक

भगवान जिव्हेश्‍वर जन्मोत्सवानिमित्त  शहरातून पालखी मिरवणूक अहमदनगर ; स्वकुळसाळी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या भगवान जिव्हेश्‍व...


भगवान जिव्हेश्‍वर जन्मोत्सवानिमित्त 
शहरातून पालखी मिरवणूक
अहमदनगर ;
स्वकुळसाळी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या भगवान जिव्हेश्‍वर यांच्या जन्मोत्सव बाडपट्टीतील मंदिरात स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळातर्फे उत्साहात साजरा झाला. यावेळी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते. जिव्हेश्‍वर मूर्तीला महाअभिषेक उद्योजक अतुल व तृप्ती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. जिव्हेश्‍वर ग्रंथाचे वाचन शकुंतला कांबळे यांनी केले. आरती तसेच पाळणा गायनाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला. फटाक्याची आतषबाजी, सनई चौघडा वाजवून शंखनाद करण्यात आला. 
जन्मोत्सवनिमित्ताने नगर शहरातून सकाळी मिरवणूक काढण्यात आली होती. बागडपट्टीतील मंदिरात उद्योजक राजेंद्र व उज्वला कांबळे यांच्या शुभ हस्ते पालखीचे पूजन करुन मिरवणूकीला प्रारंभ झाला. यामध्ये सजवलेल्या बग्गीत भगवान जिव्हेश्‍वराची प्रतिमा होती. सनई चोघडा, घोडेस्वार, विविध वाद्ये, भजनी मंडळ, समाजाच्या विविध संघटनेचे पदाधिकारी, लक्ष्मीनारायण शाळांचे विद्यार्थी यांच्यासह समाजबांधव, महिला सहभागी झाल्या होत्या.
आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड, महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, धनंजय जाधव, नगरसेवक मालन ढोणे, गणेश कवडे, किशोर डागवाले, विक्रम राठोड, माजी उपमहापौर दीपक सूळ, संजय झिंजे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी पालखीचे पूजन केले. मिरवणूक सर्जेपुरा, तेलीखुंट, चितळेरोड, दिल्लीगेट, तोफखाना मार्गे मंदिरात परत आली. यामध्ये चेअरमन ट्रस्टी संजय सागावकर, अध्यक्ष बाबासाहेब वैद्य, उत्सव समितीचे अध्यक्ष सतीश झिकरे, जितेंद्र लांडगे, अरविंद धिरडे, कृष्णा बागडे, अविनाश पावले, गजेंद्र सोनवणे, महेश कांबळे, अनुराधा मिसाळ, विक्रम पाठक आदी उपस्थित होते. महाप्रसादाच्या वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: भगवान जिव्हेश्‍वर जन्मोत्सवानिमित्त शहरातून पालखी मिरवणूक
भगवान जिव्हेश्‍वर जन्मोत्सवानिमित्त शहरातून पालखी मिरवणूक
http://epunyanagari.com/epaperimages/18082016/18082016-md-ah-17-2174-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_868.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_868.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago