Archive Pages Design$type=blogging

अतिरिक्त शिक्षकांचे प्रायोगिक ऑनलाईन समायोजन'

अतिरिक्त शिक्षकांचे प्रायोगिक ऑनलाईन समायोजन'; अहमदनगर : प्रतिनिधीनगर जिल्ह्यात ५६९ इतक्या माध्यमिक शिक्षकांच्या रिक्त जागा असू...


अतिरिक्त शिक्षकांचे प्रायोगिक ऑनलाईन समायोजन';
अहमदनगर : प्रतिनिधीनगर जिल्ह्यात ५६९ इतक्या माध्यमिक शिक्षकांच्या रिक्त जागा असून मागील वर्षात ६६ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. या शिक्षकांचे ऑनलाईन समायोजन करण्यासाठी राज्यातून नगर जिल्ह्याची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली असून हि प्रक्रिया येत्या आठवडाभरात पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणो विभागाचे शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी दिली.
फकीरवाडा मुकुंदनगर येथील यशवंतराव गाडे शिक्षण संस्थेच्यावतीने यशवंत विद्यालयात टेमकर यांची शिक्षण उपसंचालक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी सचिन जाधव यांची निवड झाल्याने त्यांचाही संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एम.पी.कचरे हे होते. यावेळी माजी सभापती व संस्थेचे खजिनदार संजय गाडे, नगरसेवक योगीराज गाडे, संचालक आसाराम म्हस्के, उपशिक्षणाधिकारी अरुण धामणो आदी उपस्थित होते.यावेळी टेमकर म्हणाले की, राज्यात ५ हजार ४८६ इतक्या रिक्त जागा असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या ४ हजार २२९ इतकी आहे. अजून चार जिल्ह्याची आकडेवारी येणो बाकी आहे. या सर्व अतिरिक्त शिक्षकांचे ऑनलाईन समायोजन करण्यात येणार असून त्यासाठी नगर जिल्ह्याची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली आहे. ही प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण करण्यात येणार आहे. 
यावेळी टेमकर व सभापती जाधव यांचा सत्कार संजय गाडे यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यालयातील १0 वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा टेमकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गाडे यांनी मुकुंदनगर मधील अनधिकृत शाळावर कार्यवाही करण्याची मागणी केली तसेच मुलासाठी क्रीडांगण उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावेळी कचरे, म्हस्के यांचे भाषण झाले. पर्यवेक्षक बी.बी.गाडेकर यांनी स्वागत केले. उद्धव गुंड यांनी प्रास्ताविक तर आदिनाथ लवांडे यांनी अतिथींचा परिचय करून दिला. मनीषा गोरे यांनी सूत्रसंचालन तर संगीता लांडगे यांनी आभार मानले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: अतिरिक्त शिक्षकांचे प्रायोगिक ऑनलाईन समायोजन'
अतिरिक्त शिक्षकांचे प्रायोगिक ऑनलाईन समायोजन'
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitHOA8FGImKt0ELU19VyKLwmOdOeyb_aVjZW7x0ycmu8J5W6leVpQHb-YvenNM6kABanUeO_eWxz4zRFsZXf-KcN6zCpXJ1nYJrghG-Og6P1g1Qs6GvXGh-74GrbLQ7bc9ucbps_tEvOjv/s200/Lss+news.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitHOA8FGImKt0ELU19VyKLwmOdOeyb_aVjZW7x0ycmu8J5W6leVpQHb-YvenNM6kABanUeO_eWxz4zRFsZXf-KcN6zCpXJ1nYJrghG-Og6P1g1Qs6GvXGh-74GrbLQ7bc9ucbps_tEvOjv/s72-c/Lss+news.png
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_869.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_869.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago