अहमदनगर शहरात मातेनेच घेतला २१ वर्षीय मु लीचा बळी; बोल्हेगाव परिसरातील घटना : महिलेला अटक, डोक्यात घातला पाटा अहमदनगर : शहरातील बो...
बोल्हेगाव परिसरातील घटना : महिलेला अटक, डोक्यात घातला पाटा
अहमदनगर : शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर येथे आईनेच आपल्या २१ वर्षीय मुलीच्या डोक्यात दगडी पाटा घालून तिचा निर्घृण खून केला. रविवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी उषा संजय काते (वय ४0) हिला ताब्यात घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गांधीनगर येथे उषा काते व तिची मुलगी मोनिका काते (वय २१) या दोघीच घरात होत्या. मोनिका हिचे वडील व भाऊ बाहेर कामाला गेले होते. यावेळी दोघींमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर भांडणात होऊन उषा काते हिने घरातील दगडाचा मोठा पाटा घेऊन थेट मोनिका हिच्या डोक्यात घातला. मोनिका जागीच गतप्राण झाली. घटनेनंतरही उषा ही घटनास्थळीच थांबून राहिली होती. ही घटना उषा काते हिचा पुतण्या रामा बच्छू काते याला समजल्यानंतर त्याने तोफखाना पोलिसांना माहिती दिली. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे व उपनिरीक्षक के. डी. शिरतावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपी उषा काते हिला ताब्यात घेतले. या प्रकरणी रामा बच्छू काते याने फिर्याद दाखल केली आहे. आईनेच आपल्या मुलीचा असा निर्दयी पद्धतीने खून केल्याने गांधीनगर परिसरात खळबळ उडाली असून, या हत्येचे कारण समोर आलेले नाही. फौजदार के. डी. शिरतावडे तपास करीत आहेत.










