महापालिकेच्या आरोग्य विभागाचा उपक्रम; .अहमदनगर; मुकुंदनगर येथील प्रभाग क्र. ९ मध्ये महापालिका आरोग्य विभागाच्यावतीने हिवताप...
मुकुंदनगर येथील प्रभाग क्र. ९ मध्ये महापालिका आरोग्य विभागाच्यावतीने हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया या आजारासंदर्भात जनजागृती अभियान राबवून आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबीराचे उद््घाटन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नसिम शेख यांच्या हस्ते झाले. यावेळी आरोग्यधिकारी डॉ.दीपक दळवी, सहा.जिल्हा हिवताप अधिकारी बी.बी.घुसळे, डॉ.आयशा शेख, बालरोग तज्ञ डॉ.डोंगरे, डॉ.घोलप, सुडके आदिंसह मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शेख म्हणाल्या की, मुकुंदनगर भागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया सारख्या आजारात वाढ झाली आहे. या आजाराने घाबरुन न जाता नागरिकांनी योग्य निदान व उपचार घेतल्यास हा आजार पुर्णत: बरा होतो. नागरिकांनी काळजी घेतल्यास हे आजार उद्भवणार नाही. घरात जास्त दिवस पाणी साचवून न ठेवता, आजारी पडल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करावी. परिसरात साचलेल्या पाण्यामध्ये डासांच्या अळी नष्ट करणासाठी अळीनाशक द्रव्य टाकण्याचे काम चालू असून, लवकरच डास नाशक धुराची फवारणी केली जाणार असल्याचे त्यांनीमुकुंदनगरमधील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली
महापालिकेच्या आरोग्य विभागाचा उपक्रमसांगितले. जनजागृती अभियानात हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया या आजाराला प्रतिबंध करण्याकरिता डासाची उत्पत्ती थांबवण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. परिसरात भिंती पत्रके लावून, घरा-घरात माहिती पत्रके वाटण्यात आली. शिबीरात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी प्रभागातील अबालवृध्दांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी रुग्णांना औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
|










