जिल्हा दारूमुक्तीसाठी अण्णांच्या लढय़ास पाठिंबा द्या : अमोल घोलप स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभांत करा दारूबंदीचा एल्गार निघोज व चाप...
जिल्हा दारूमुक्तीसाठी अण्णांच्या लढय़ास पाठिंबा द्या : अमोल घोलप
स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभांत करा दारूबंदीचा एल्गार

निघोज व चापडगावच्या तरूण - महिलांची प्रेरणा घ्या
निघोज व चापडगाव येथे तरूण व महिलांच्या लढय़ानंतर दारूबंदी झाली. निघोजच्या तरूण व महिलांनी ६ महिने दारूबंदीसाठी मोठा लढा देत दारूबंदीच्या विरोधात एल्गार पुकारला होता. त्यांची प्रेरणा घेऊन प्रत्येक गावातील महिला व तरूणांनी दारूबंदीचे आंदोलन जनआंदोलन करावे.
स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभांत करा दारूबंदीचा एल्गार , जिल्हा दारूमुक्तीसाठी अण्णांच्या लढय़ाला पाठिंबा द्या - अमोल घोलपनिंबेनांदूर / प्रतिनिधी -
स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक गावातील ग्रामसभेत दारूबंदीचे ठराव करण्यासाठी तरूण व महिलांनी पुढाकार घेऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेली दारूबंदीची लढाई बुलंद करावी. आपल्या गावात आपलं सरकार या भूमिकेतून जिल्ह्यातील प्रत्येकाने दारूच्या विरोधात एल्गार पुकारावा, असे आवाहन दारूबंदी समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल घोलप यांनी केले.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटंले आहे की, हजारे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून दारूबंदीचा लढा सुरू केला आहे. अलीकडे कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खुनाची घटना घडली. त्यातील, विकृत आरोपींनी मद्यपान केलेले होते. तसेच, अनेकांचे घर-प्रपंच दारूच्या व्यसनापायी बरबाद होण्यापासून वाचावेत, यासाठी प्रत्येक गावातील तरूण महिलांनी दारूबंदीच्या विरोधात सजग होणो ही काळाची गरज आहे. अण्णांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी अनिल कवडे व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या ग्रामसभांत व्यसनमु्क्ती असा विषय ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या ग्रामसभेत दारूबंदीसाठी विशेष ग्रामसभेची मागणी या वेळी तरूण व महिलांनी करावी. आपले गाव दारूमुक्त करावे.
ज्या गावातील ग्रामसेवक किंवा पंचायतीचे पदाधिकारी दारूबंदीच्या विषयाकडे दुर्लक्ष करतील, त्यांची तत्काळ माहिती दारूबंदी समितीला कळवावी. अशा ग्रामसेवक व पंचायतीच्या पदाधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली जाईल. तसेच,पुन्हा ग्रामसभा घेण्याची मागणी करण्यात येईल. हजारे यांच्या लढय़ाला सर्व नागरिकांनी पाठिंबा देवून जिल्हा दारूमुक्त करावा, असे आवाहन दारूबंदी समितीचे राज्य समन्वयक हेरंब कुलकर्णी, जिल्हाध्यक्षा रंजना गवांदे, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल घोलप, शेवगाव तालुकाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, निघोजचे बबनराव कवाद, नानासाहेब देशपांडे, सोमनाथ पातकळ, उमेश भालसिंग, अशोक ढाकणो, बाळासाहेब सुसे, बाळासाहेब मालूंजकर आदीनी केले आहे









