ज्ञानरचनावादी बालमित्र'चे विद्यार्थ्यांकडून स्वागत सुपा /; इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानरचनावादी अध्ययन-अ...
ज्ञानरचनावादी बालमित्र'चे विद्यार्थ्यांकडून स्वागत
सुपा /;

इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन पद्धतीवर आधारित मराठी व गणित विषयासाठीचे ज्ञानरचनावादी बालमित्र या पुस्तकाचे लेखन, जि प प्राथमिक शाळा पवारवाडी (सुपा) येथील शिक्षक ज्ञानेश्वर इंगळे यांनी केले असून्. नुकतेच त्याचे प्रकाशन पारनेर येथे,नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार भारती सागरे, गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ खामकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रकाशनानंतर अनेक शाळांतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सदर पुस्तकाची मागणी नोंदवून पुस्तकाचे स्वागत केले.
या पुस्तकात चित्रसहित वर्णमालेनुसार बाराखडी,अक्षर-शब्द-वाक्य या क्रमाने वाचन,लेखन सरावासाठी मोठय़ा प्रमाणात शब्द संग्रह, अक्षरबाग, वाक्यपर्वत, अक्षरगाडी, तीन शब्दांपासून गोष्ट तयार करणो,अंक ओळख, दर्शक संकल्पना, पाढे, गणिती क्रियांसाठी भरपूर उदाहरणो,शाब्दिक उदाहरणो, ज्ञानरचनावादी प्रश्नावली, भौमितीक संकल्पना, कालमापन, ज्ञानमंजुषा यासह अनेक घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
या मुळे पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या व इयत्तानुरूप क्षमतांमध्ये मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी,त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी, ज्ञानरचनावादी बालमित्र हे पुस्तक एक मैलाचा दगड ठरेल ,यात शंका नाही असे इंगळे यानीं या वेळी बोलताना सांगितले.पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छोटा भीम,चुटकी सारखी इतर काटरून व मलपृष्ठावर वैशिष्टयासह अक्षरगाणी ,चटकन विद्यार्थ्यांना आकर्षित करते. पुस्तक लेखनासाठी मनीषा इंगळे,रामदास पाचरे, राजू कोल्हे,रोहिणी वाघ यांनी सहकार्य केले. तर शिक्षणाधिकारी अशोक कडूस, गटशिक्षणाधिकारी के एल पटारे, जगन्नाथ खामकर,विस्तार अधिकारी संभाजी झावरे,विनेश लाळगे,केंद्रप्रमुख नाना गायकवाड , ज्ञानदेव कोल्हे,बाबासाहेब भोर, मुख्याध्यापिका मंगल पवार यांनी लेखनासाठी मार्गदर्शन केले.









