महिला सक्षमिकरण कार्यक्रम पारेवाडी येथे संपन्न; आदिनाथनगर- पाथर्डी तालुक्यातील पारेवाडी या आदर्श गावामध्ये गावच्या सरपंच रोहिणी...
महिला सक्षमिकरण कार्यक्रम पारेवाडी येथे संपन्न;
![]()
आदिनाथनगर-
पाथर्डी तालुक्यातील पारेवाडी या आदर्श गावामध्ये गावच्या सरपंच रोहिणी लवांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महिला सबलिकरण या चर्चासत्रामध्ये गावातील सर्व महिलांनी सहभाग घेतला. महसूल विभागाच्या राजस्व अभियानाअंतर्गत महिला सक्षमीकरण अंतर्गत विविध योनजांची व महिलांच्या हक्काविषयी महसूल विभागाच्या वरिष्ठांनी महिलांना मार्गदर्शन केले. लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत ७-१२ उतार्यावर पुरुषाबरोबरच महिलेचेसुद्धा मालकी हक्क म्हणून नोंद होणार आहे. वारस नोंद उतार्यावर नाव वगळले असल्यास कुटुंबातील महिलेचे नाव उतार्यावर घेणे, महिला खातेदारांच्या तक्रारीबाबत तात्काळ दक्षता घेणे, रोजगार हमी योजनेतील महिला जॉबकार्ड धारकांना तात्काळ जॉबकार्ड देणे, शिधापत्रीकेवर कुटुंब प्रमुख म्हणून महिलांची नोंदणी करणे, अठरा वर्षे पूर्ण झालेल्या मुला-मुलींची नावे मतदार यादीत घेणे, मुलींना अधिवास व उत्पन्नाचे दाखले वाटप करणे, अर्थसहाय्य योजनांचे प्रस्ताव मंजूर करणे अशा विविध विषयांची सविस्तर माहिती सर्कल चिंतामणी व तलाठी पी. ए. शिंदे यांनी यावेळी दिली. यावेळी ग्रामसेवक प्रमोद म्हस्के, ग्रा. पं. सदस्या भामाबाई लवांडे, सुवर्णा आठरे, ताराबाई आठरे, जयश्री आठरे, सुनिता साळवे, अलका गिरी, उषा घोरपडे, संगिता साळवे आदी उपस्थित होत्या.
|










